मुंबईत डाॅन बनण्याचं स्वप्न पडलं महागात

काही महिन्यापूर्वी अखिलने सागरला खारमधील एका विकासकाला पैशांसाठी धमकवण्यास सांगितले. त्यानुसार कसलाही विचार न करता सागरने थेट विकासकाला फोन करून २५ लाखासाठी धमकावले आणि सागर पोलिसांच्या नजरेत आला.

मुंबईत डाॅन बनण्याचं स्वप्न पडलं महागात
SHARES

कुख्यात गुंड बनण्याचं स्वप्न मनाशी बाळगत, अंडरवर्ल्डमध्ये सक्रीय होऊ पाहणाऱ्या एका तरुणाच्या मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाने वेळीच मुसक्या आवळल्या आहेत. सागर यादव (२१) असं या तरुणाचं नाव आहे. कुख्यात गुंड इजाज लकडावालाच्या सांगण्यावरून एका विकासकाला त्याने धमकावले होते. पोलिसांनी त्याला मकोकाअंतर्गत गुन्हा नोंदवत अटक केली आहे. 


बॅनर लावून दहशत 

मिरारोड परिसरात सागर हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. त्याच्या कुटुंबियांचा त्या परिसरात वडिलोपार्जीत डेअरीचा व्यवसाय आहे. तर त्याचे वडील एका राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यासोबत समाजकार्य करतात. तर मोठ्या भावाची बिअर शाॅप आहे. मूळातच दहावीपासून सागरने शिक्षण सोडल्यानंतर परिसरात दमदाटी करण्यास सुरूवात केली. चांगल्या मार्गाने कुणीही कधी मोठे होऊ शकले नाही हा गैरसमज त्याच्या मनात होता. यातूनच परिसरात मोठ मोठे बॅनर लावून स्वत:ची दहशत ठेवायचा. अशातच २०१६ च्या गणेशोत्सव काळात अंडरवर्ल्ड डाॅन इजाज लकडावालाचा भाऊ अखिलची नजर त्याच्यावर पडली. त्यावेळी अखिलने त्याची भेट घेत जवळीकता वाढवली. सागरला गँगमध्ये सामील करण्यासाठी त्याने त्या अनेक मोठमोठी आश्वासन दिली. एका अंडरवल्ड डाॅनने डोक्यावर हात ठेवल्यानंतर सागर वेगळ्याच धुंदीत होता. 


२५ लाखासाठी धमकावलं 

यातूनच काही महिन्यापूर्वी अखिलने सागरला खारमधील एका विकासकाला पैशांसाठी धमकवण्यास सांगितले. त्यानुसार कसलाही विचार न करता सागरने थेट विकासकाला फोन करून २५ लाखासाठी धमकावले आणि सागर पोलिसांच्या नजरेत आला. विकासकाने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार नोंदवल्यानंतर मंगळवारी पोलिसांनी त्याला अटक केली. सागरवर यापूर्वी कुठल्याही गुन्ह्यांची नोंद नाही. त्याच्यावरचा हा पहिला गुन्हा असून त्यात थेट  इजाज लकडावालाचा हात असल्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. त्याच्या चौकशीतून इजाज हा सध्या कॅनडा येथे लपून बसला असल्याचं पुढं आलं आहे. न्यायालयाने सागरला १२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 



हेही वाचा -

आरोपीकडं लाच मागणाऱ्या उपनिरीक्षकाला अटक




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा