आरोपीकडं लाच मागणाऱ्या उपनिरीक्षकाला अटक

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संबंधीत तक्रारदाराला तडीपारीची नोटीस पाठवण्यात आला होती. तक्रारदाराला तडीपार न करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक दळवीने अडीच लाख रुपयांची लाच मागितली.

आरोपीकडं लाच मागणाऱ्या उपनिरीक्षकाला अटक
SHARES

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोपीला तडीपार न करण्यासाठी लाच मागणाऱ्या साकीनाका पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली. जगदीश दळवी असं या उपनिरीक्षकाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे


अडीच लाखांची मागणी

 राज्यात लोकसभा निवडणुकीचं वातावरण असल्याने सराईत आरोपींकडून कुठल्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पोलिस त्यांच्यावर तडीपारची कारवाई करतात. साकीनाका पोलिस ठाण्यात तक्रारदार आरोपीवर २०१४ मध्ये एका गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी दोषारोपपत्र सादर केल्यानंतर न्यायालयाने त्याला ३ वर्ष कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. या गुन्ह्यात आरोपीला कालांतराने न्यायालयाने जामीनावर मुक्त केले. दरम्यान लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संबंधीत तक्रारदाराला तडीपारीची नोटीस पाठवण्यात आला होती. तक्रारदाराला तडीपार न करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक दळवीने अडीच लाख रुपयांची लाच मागितली. चर्चेअंती दळवीने  लाचेचा पहिला हप्ता म्हणून २५ हजार रुपये मागितले. मात्र तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्याने एसीबीकडे तक्रार नोंदवली.



हेही वाचा  -

‘आरएमसीपीएल’ कंपनीचा डेटा प्रतिस्पर्धी कंपन्यांना विकल्याप्रकरणी एकाला अटक

गायक रॉडनीच्या फसवणुकीप्रकरणी दुसऱ्या आरोपीला अटक




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा