COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,26,710
Recovered:
46,00,196
Deaths:
78,007
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,859
2,116
Maharashtra
5,46,129
46,781

गायक रॉडनीच्या फसवणुकीप्रकरणी दुसऱ्या आरोपीला अटक

गुजरातमधील मामा संजय अग्रवाल यांच्यामार्फत जमिनीमध्ये पैसे गुंतवून १८ ते २२ टक्के परतावा देण्याचं आमीष दाखवलं. त्यानुसार ऑक्‍टोबर २०१५ पासून रॉडनीने त्याच्याकडे गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. तसंच रॉडनीने यापूर्वी खरेदी केलेल्या सोन्याचीही अग्रवालकडे गुंतवणूक केली. असे एकूण १५ कोटी ६० लाख रुपये २०१८ पर्यंत अगरवालकडे जमा करण्यात आले.

गायक रॉडनीच्या फसवणुकीप्रकरणी दुसऱ्या आरोपीला अटक
SHARES

प्रसिद्ध पॉप गायक रॉडनी फर्नांडीसची १७.७७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दुसऱ्या आरोपीला अटक करण्यात यश आलं आहे. संजय अग्रवाल असं या आरोपीचं नाव आहे.  जमिनीमध्ये पैसे गुंतवणूकीच्या नावाखाली या टोळीने रॉडनीला १८ ते २२ टक्के परतावा देण्याचं आमीष दाखवलं होतं. 


सोन्याचीही गुंतवणूक

फाइंडिग फॅनी सारख्या चित्रपटांसाठी तसंच स्वच्छ भारत अभियानासाठी गायन केलेल्या रॉडनीच्या तक्रारीनुसार, २०१५ मध्ये रॉडनीची ओळख मयुर अगरवाल याच्यासोबत झाली. त्याने त्याचे गुजरातमधील मामा संजय अग्रवाल यांच्यामार्फत जमिनीमध्ये पैसे गुंतवून १८ ते २२ टक्के परतावा देण्याचं आमीष दाखवलं. त्यानुसार ऑक्‍टोबर २०१५ पासून रॉडनीने त्याच्याकडे गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. तसंच रॉडनीने यापूर्वी खरेदी केलेल्या सोन्याचीही अग्रवालकडे गुंतवणूक केली. असे एकूण १५ कोटी ६० लाख रुपये २०१८ पर्यंत अगरवालकडे जमा करण्यात आले. सुरुवातीला २०१६ पर्यंत रॉडनीला अग्रवालने नियमित व्याजाचे पैसे दिले. त्यामुळे त्याच्या बॅण्डमधील इतर ९ सदस्यांनीही अग्रवालकडे २ कोटी १५ लाख रुपये गुंतवले. 


फसवणूक २३ कोटींवर 

२०१७ नंतर व्याजाची रक्कम मिळण्यास बंद झाल्यामुळे रॉडनी व त्याच्या सहकलाकारांनी १७.७७  कोटींची फसवणूक झाल्याची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे केली. त्यानुसार या प्रकरणी संजय अग्रवाल, मयूर अग्रवाल बंगेरा व लोहादीया यांच्याविरुद्ध २५ फेब्रुवारीला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी मयूर अग्रवालला अटक केली होती. फर्नांडीसप्रमाणेच फसवणूक झालेले आणखी पाच तक्रारदार पोलिसांकडे आले आहेत. त्यामुळे या प्रकरणातील फसवणूकीची रक्कम २३ कोटींवर पोहोचली आहे. हेही वाचा -

गँगस्टर अनिस रोडिओवालाचा ताबा घेण्यासाठी मुंबई पोलिसांचं पथक दिल्लीला

मोबाइल चोरामुळे डाॅक्टरने गमावला पाय
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा