मोबाइल चोरामुळे डाॅक्टरने गमावला पाय

रेल्वे डब्यात नेटवर्क येत नसल्यामुळे खान लोकलमधून उतरले. त्याचवेळी पुन्हा त्यांना फोन आला. ते फोनवर बोलत लोकलच्या डब्याजवळून जात असताना धावत्या लोकलमधून चोरट्यांनी खान यांचा मोबाइल हिसकावला. त्यावेळी खान लोकलच्या मागे पळत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते लोकलखाली आले.

मोबाइल चोरामुळे डाॅक्टरने गमावला पाय
SHARES

मुंबईतल्या लोकलमधील मोबाइल चोरांमुळे उत्तर प्रदेशमधील एका होमिओपॅथिक डाॅक्टरला आपला एक पाय गमवावा लागला आहे. अख्तर अली खान असं या डाॅक्टरचं नाव असून पोलिस त्या सराईत मोबाइल चोरांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी वडाळा रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


मोबाइल हिसकावला

उत्तर प्रदेशमधील जोनपूरचे राहणारे डाॅ. खान तीन महिन्यापूर्वी मुलाच्या कामानिमित्त मुंबईला आले होते. खान यांचा मुलगा मुंबई विद्यापीठ येथे शिकत आहे. सध्या खान हे मित्राजवळ राहत आहेत. शुक्रवारी खान यांनी मानखुर्दहून सॅन्डहर्स्ट जाण्यासाठी लोकल पकडली. ते रेे रोडला पोहचणार त्यावेळी त्यांना एक महत्वाचा फोन आला. मात्र रेल्वे डब्यात नेटवर्क येत नसल्यामुळे खान लोकलमधून उतरले. त्याचवेळी पुन्हा त्यांना फोन आला. ते फोनवर बोलत लोकलच्या डब्याजवळून जात असताना धावत्या लोकलमधून चोरट्यांनी खान यांचा मोबाइल हिसकावला. त्यावेळी खान लोकलच्या मागे पळत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते लोकलखाली आले. या दुर्घटनेत खान यांचा एक पाय कायमचा निकामी झाला.


प्रवासी फोटोमध्ये दंग

रक्ताच्या थारोळ्यात असलेले खान मदतीसाठी स्थानकावरील प्रवाशांना बोलवत होते. मात्र एक-दोन प्रवाशी सोडले तर बाकी सर्व खान यांना मोबाइलमध्ये कैद करण्यात गुंतले होते. कोण व्हिडिओ तर कोण फोटो काढत होते. दरम्यान, ही माहिती रेल्वे पोलिसांना मिळाल्यानंतर गस्तीवरील रेल्वे पोलिस तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी खान यांना उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात हलवले. खान यांच्या अपघाताची माहिती त्यांचा मुलगा आणि गावी पत्नीला दिली आहे. त्या मोबाइल चोरांंचा फोटो किंवा समोर पाहिल्यास त्यांना ओळखू असं खान यांनी पोलिसांना सांगितलं आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपींची ओळख पटवण्यासाठी स्थानक परिसरातील सीसीटिव्ही फूटेज पोलिस तपासत आहेत.


मोबाइल चोरीची आकडेवारी

वर्ष          गुन्हे
२०१२             
७८४
२०१३         
१०४५ 
२०१४            
१५१८
२०१५             
२०९२
२०१६          
२००९
२०१७          
२०,७६४
२०१८ (आॅगस्टपर्यंत)       
 २२,९२०



हेही वाचा -      

हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी सहाय्यक अभियंत्याला अटक

लोकलमध्ये मोबाइल चोरणाऱ्या तरूणीस अटक




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा