गँगस्टर ओबेद रोडिओवालाचा ताबा मुंबई पोलिसांकडे

प्रसिद्ध गायक हिमेश रेशमिया याला खंडणीसाठी फोन करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या इजाज लकडावाला गँगचा हस्तक कुख्यात गुंड ओबेद रोडिओवाला याचा ताबा मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाने घेतला आहे.

गँगस्टर ओबेद रोडिओवालाचा ताबा मुंबई पोलिसांकडे
SHARES

प्रसिद्ध गायक हिमेश रेशमिया याला खंडणीसाठी फोन करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या इजाज लकडावाला गँगचा हस्तक कुख्यात गुंड ओबेद रोडिओवाला याचा ताबा मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाने घेतला आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी आधीच ४ सराईत आरोपींना अटक केली होती.


पोलिसांकडं धाव

प्रसिद्ध गायक हिमेश रेशमिया आणि दिग्दर्शक राज कुमार संतोषी यांना लकडावाला गँगकडून २००७ मध्ये खंडणीसाठी धमकावण्यात आलं होतं. हिमेश त्यावेळी 'सारेगमप' या रिअॅलिटी शोमध्ये जज होता. या शो ला मिळणारा प्रतिसाद पाहून लकडावाला गँगकडून रोडिओवालाने हिमेशला खंडणीसाठी धमकावलं. सोबतच लकडावालाने चित्रपट दिग्दर्शक राज कुमार संतोषी यांनाही पैशांसाठी धमकावलं. मात्र दोघांनीही लकडावाल्याच्या धमकीला दाद न देता मुंबई पोलिसांकडे तक्रार केली.


नाव बदलून अमेरिकेला

इजाज लकडावालाने दोघांनी जीवे मारण्याची सुपारी युपीतला सराईत आरोपी आणि इजाज लकडावालाचा उजवा हात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओबेद  रोडिओवाला, नामदेव, रहिम खान आणि इशरत वारसी यांना दिली होती. मात्र स्पेशल टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांना त्याची कुणकुण लागली. पोलिस मागावर असल्याचं कळताच रोडिओवालाने स्वत:चं नाव बदललं. मर्चंट नावाने बनावट पासपोर्ट बनवून तो अमेरिकेला गेला खरा, परंतु तो  अमेरिकेतील तपास यंत्रणांच्या हाती लागला. त्यानंतर रोडिओवालाला पुन्हा भारताच्या हवाली करण्यात आलं. 


मुंबईतही अनेक गुन्हे

रोडिओवालावर मुंबईतही अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट आणि निर्माते करीम मोरानी यांच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबारातही रोडिओवालाचा सहभाग होता. त्यामुळे मुंबई पोलिसांनी रोडिओवालाचा ताबा मागितला. त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या घेत मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाचे पोलिस सोमवारी दिल्लीला गेले. मात्र कागदांची पूर्तता न झाल्याने त्याचा ताबा मंगळवारी मुंंबई पोलिसांंना मिळाला.



हेही वाचा - 

हिमालय पूल दुर्घटना : पालिकेच्या सहाय्यक अभियंत्याला ५ एप्रिलपर्यंत कोठडी

मोबाइल चोरामुळे डाॅक्टरने गमावला पाय




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा