‘आरएमसीपीएल’ कंपनीचा डेटा प्रतिस्पर्धी कंपन्यांना विकल्याप्रकरणी एकाला अटक

प्रसिद्ध ‘आरएमसीपीएल’ कंपनीचा डेटा चोरी करून तीन प्रतिस्पर्धी कंपन्यांना विकल्याच्या आरोपाखाली मरीनड्राइव्ह पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

‘आरएमसीपीएल’ कंपनीचा डेटा प्रतिस्पर्धी कंपन्यांना विकल्याप्रकरणी एकाला अटक
SHARES

प्रसिद्ध ‘आरएमसीपीएल’ कंपनीचा डेटा चोरी करून ३ प्रतिस्पर्धी कंपन्यांना विकल्याच्या आरोपाखाली मरीन ड्राइव्ह पोलिसांनी एकाला अटक केली आहे. राजेश सैगल असं या आरोपीचं नाव आहे. त्यानं फसवणुकीतले ९१ लाख रुपये पत्नीच्या नावावर फिरवल्याचं तपासातून पुढं आलं आहे. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंदवून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.


९१ लाखांची चोरी

‘आरएमसीपीएल’ ही कंपनी विशिष्ट रसायनं, उपकरणं, औद्योगिक क्षेत्रासाठी उपयुक्त सामग्री, पाणी व तेल शुद्धीकरणाचं काम करते. या निर्मितीसाठी येणाऱ्या खर्चाची रकमेची माहिती गोपनीय ठेवली जाते. चर्चगेट इथं या कंपनीचं कार्यालय आहे.

सैगल २०१३ साली कंपनीतील विक्री आणि पणन विभागात उपाध्यक्ष पदावर कार्यरत होता. त्यावेळी त्यानं मे. टेट्रकॉम कंपनीला उत्तर भारतातील व्यावसायिक विस्तासाठी एजंट म्हणून नेमलं. या कंपनीला व्यवसाय विस्तारासाठी सैगलने २०१४ ते २०१७ दरम्यान ९१ लाख ६८ हजार रुपये खर्चासाठी दिले. मात्र, असा कोणताही खर्च करण्यात आला नसल्याचं निष्पन्न झाल्यानंतर सैगल याची चोरी उघडकीस आली.

तपासात निष्पण्ण

तपासात सैगल यानं कंपनीचा गोपनीय डेटा इतर तीन प्रतिस्पर्धी कंपन्यांना दिल्याचंही पुढं आलं. त्यामुळं कंपनीला ६५ कोटी रुपयांचा बसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ‘आरएमपीएल’ कंपनीच्या व्यवस्थापकीय विभागाने सैगल विरोधात मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात मंगळवारी सैगलला पोलिसांनी अटक केली.




हेही वाचा -

मोबाइल चोरामुळे डाॅक्टरने गमावला पाय

गँगस्टर अनिस रोडिओवालाचा ताबा घेण्यासाठी मुंबई पोलिसांचं पथक दिल्लीला



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा