Advertisement

फिल्म सिटीसाठी 700 झाडांवर कुऱ्हाड

फिल्म सिटीच्या प्रवेशद्वारावर 22 एकर भूखंडावर योजना आखत आहे.

फिल्म सिटीसाठी 700 झाडांवर कुऱ्हाड
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिका (bmc) गोरेगाव (goregaon) येथील फिल्म सिटीच्या प्रवेशद्वारावर 22 एकर भूखंडावर एक प्रकल्प घेऊन येणार आहे. यात मुलुंड (mulund) आणि गोरेगाव दरम्यान हा प्रकल्प कास्टिंग यार्ड आणि बोरिंग मशीन उभारणार आहे. या प्रकल्पासाठी (project) प्रशासनाने सुमारे 700 झाडे (trees) तोडण्याच्या विचारात आहे.

फिल्मसिटीची जागा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (sgnp) शेजारी स्थित आहे. जे बिबट्या, हरीण, सांबर आणि नीलगाय यांसारख्या वन्यजीवांचे आश्रयस्थान आहे. तसेच मोर आणि बिबट्या अनेकदा फिल्मसिटीमध्ये वावरताना आढळतात.       

फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती म्हसे-पाटील यांनी माहिती दिली की, महापालिकेने जमिनीची माहिती मागितली आहे. परंतु ते अद्याप त्यावर निर्णय घेऊ शकलेले नाहीत. वनशक्ती या एनजीओचे डी स्टॅलिन यांनी झाडे तोडण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. त्यांनी पत्रात नमूद केले आहे की “मुंबई महापालिका (bmc) दररोज संपूर्ण मुंबई शहरात झाडे तोडण्यासाठी परवानगी देत आहे. पालिकेचे हे निर्णय अस्वस्थ करणारे आहेत.

पर्यावरणप्रेमी डी स्टॅलिन यांनी सांगितले की, फिल्म सिटी एसजीएनपीच्या इको सेन्सिटिव्ह झोन (esz) मध्ये येते. फिल्मसिटीने 51 एकर वनजमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याचे आणि ती जमीन वनविभागाला परत देण्यास नकार दिल्याचे अनेक रेकॉर्डनुसार दिसून येतात.



हेही वाचा

चेंबूरच्या आगीत माणुसकीही झाली खाक

Metro Connect 3 ॲपचे अनावरण, मात्र प्रवासी नाखूश

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा