Advertisement

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड बोगद्यासाठी SGNP जवळील झोपड्यांवर हातोडा

सुमारे 750 जणांना बीएमसीकडून नोटीस मिळाल्या आहेत.

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड बोगद्यासाठी SGNP जवळील झोपड्यांवर हातोडा
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मुलुंडमधील अमर नगर झोपडपट्टीतील सुमारे 750 झोपडपट्ट्या पाडण्याच्या तयारीत आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR) बोगद्यासाठी मार्ग तयार करण्यासाठी या झोपड्या पाडण्यात येणार आहेत.

झोपडपट्टी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (SGNP) जवळ आहे. प्रकल्पग्रस्तांना झोपडपट्टीधारकांना भांडुप पश्चिम येथे स्थलांतरित केले जाईल. सूत्रांनुसार, अमर नगर झोपडपट्टीमध्ये अंदाजे 1,707 रहिवासी राहतात. त्यापैकी सुमारे 750 जणांना बीएमसीकडून नोटीस मिळाल्या आहेत.

तथापि, अनेक रहिवाशांना पुनर्स्थापनेबाबात काही प्रमाणात गोंधळलेले आहेत. बीएमसीने रहिवाशांची पात्रता पडताळण्याची प्रक्रिया आधीच पूर्ण केली आहे.

HT च्या अहवालात, पूल विभागातील BMC प्रतिनिधीने दावा केला आहे की प्रकल्पग्रस्त व्यक्तींना (PAPs) 300-स्क्वेअर फूट अपार्टमेंट्स दिले जातील. पुनर्स्थापना प्रकल्प सध्या प्रगतीपथावर आहे आणि त्यात रुणवाल वनक्षेत्रात 906 सदनिकांच्या बांधकामाचा समावेश आहे.

काही स्थानिकांनी  अपार्टमेंटमधील घरे लहान असल्याने चिंता व्यक्त केली आहे. पूर्वी, रहिवाशांना 375 चौरस फूट घराचे आश्वासन दिले होते, परंतु सध्याची घरं केवळ 300 चौरस फूट इतकी आहेत.

असे असूनही, बीएमसीने घरांचे बांधकाम चालू ठेवले आहे. जून 2025 पर्यंत गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. गृहनिर्माण संकुलात प्रत्येकी 23 मजले आणि प्रत्येक टॉवरचे सात विंग असलेले तीन टॉवर असतील. बीएमसीचा इमारत आणि बांधकाम विभाग हा प्रकल्प हाताळत आहे आणि सुमारे 21% काम पूर्ण झाले आहे.

GMLR प्रकल्प हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे जो मुलुंड आणि गोरेगावमधील कनेक्टिव्हिटी सुधारेल. प्रकल्पाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे 4.7-किलोमीटरचा बोगदा जो संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (SGNP) खाली जाईल.

हा बोगदा मुलुंडमधील इस्टर्न एक्सप्रेस हायवे (EEH) ला गोरेगावमधील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे (WEH) ला जोडेल. हा बोगदा गोरेगावच्या ओबेरॉय मॉलजवळून सुरू होईल आणि EEH वर ऐरोली जंक्शनवर संपेल.

या प्रकल्पामुळे मुलुंड ते गोरेगाव दरम्यानचा प्रवासाचा वेळ सध्याच्या 90 मिनिटांवरून केवळ 25 मिनिटांवर येणार आहे. BMC ने बोगदे पूर्ण करण्यासाठी ऑक्टोबर 2028 ही अंतिम मुदत ठेवली आहे.



हेही वाचा

मेट्रो 3 : तोडलेल्या 3093 झाडांपैकी केवळ 724 झाडांचेच पुनर्रोपण

मालाड : इमारतीचा स्लॅब कोसळून 3 कामगारांचा मृत्यू

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा