Advertisement

तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान 765 फुकट्या प्रवाशांची धरपकड

सीएसएमटी आणि जवळपासच्या स्थानकांवर तपासणीसाठी 9 आरपीएफ कर्मचाऱ्यांसह एकूण 51 तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान 765 फुकट्या प्रवाशांची धरपकड
SHARES

मध्य रेल्वेच्या (central railway) मुंबई (mumbai) विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे 7 ऑक्टोबर 2024 रोजी नवरात्रीच्या (Navratri) निमित्ताने "नव दुर्गा" या विशेष तिकीट तपासणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

"नव दुर्गा" हे मुंबई विभागाच्या महिला (women) स्पेशल तिकीट तपासणीची मोहीम तेजस्विनी या बॅचने राबवली. या उपक्रमाचा मूळ उद्देश तिकीट तपासणीच्या (ticket checking) प्रयत्नांना बळकटी देणे आणि अधिकृत तिकिटासोबत प्रवास करण्याबाबत जागरूकता वाढवणे आहे.

सीएसएमटी आणि जवळपासच्या स्थानकांवर तपासणीसाठी 9 आरपीएफ कर्मचाऱ्यांसह एकूण 51 तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सकाळी 8.00 ते दुपारी 16:00 वाजेपर्यंत ही मोहिम राबवली गेली. या मोहिमेदरम्यान, विनातिकीट प्रवास करणाऱ्या एकूण 765 प्रवाशांना पकडले. तसेच या मोहिमेद्वारे 2,06,550 रुपये इतका दंड वसूल केला.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेल्वे प्रशासनाने सहभागी कर्मचाऱ्यांचे त्यांच्या मेहनत आणि समर्पणाबद्दल त्यांचे मनःपूर्वक कौतुक केले. तसेच प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध रेल्वे तिकीट खरेदी करून सन्मानाने प्रवास करण्याचे आवाहन केले.



हेही वाचा

17 ऑक्टोबरला मुंबई विमानतळ 6 तासांसाठी बंद

चेंबूरच्या आगीत माणुसकीही झाली खाक

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा