Advertisement

वीज कामगारांचा संपाचा इशारा, हवाय बोनस

बोनस न मिळाल्यास राज्यातील ८६ हजार वीज कर्मचारी संपावर जातील, असा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे.

वीज कामगारांचा संपाचा इशारा, हवाय बोनस
SHARES

यंदा कोरोनामुळं अनेकांचा रोजगार गेला. त्यामुळं सर्व सण साधेपणाने साजरे करण्यात आले. अशात दिवाळी सुरू झाली असून, या दिवसांत कामगारांचे बोनस होतात. परंतु, कोरोनाच्या सावटामुळं बोनस होणं अवघड होतं. मात्र दिवाळीनिमित्त सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्यात आला आहे. अशातच आता वीज कामगारांनीही बोनसची मागणी केली आहे. शिवाय, बोनस न मिळाल्यास राज्यातील ८६ हजार वीज कर्मचारी संपावर जातील, असा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे.

बोनसच्या मागणीबाबत तिन्ही वीज कंपन्यांचे व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींमधील बैठक अयशस्वी ठरल्यानं ऐन दिवाळीच्या दिवशी १४ नोव्हेंबरला सकाळी ८ पासून राज्यातील ८६ हजार वीज कर्मचारी संपावर जाणार असल्याचा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या ३ कंपन्यांमध्ये ८६ हजार कामगार, अभियंते व अधिकारी काम करतात. कामगार संघटनांचे प्रतिनिधी व ऊर्जा सचिव असिम गुप्ता, तिन्ही कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक यांच्यात बोनसच्या मागणीबाबत गुरुवारी चर्चा झाली. २७ संघटनांनी पत्राद्वारे बोनस देण्याची मागणी केलेली आहे. त्यासाठी तिन्ही कंपन्यांनी मिळून राज्यातील सर्व वीज कर्मचाऱ्यांना १२० कोटी रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी केली.

कोरोनाच्या टाळेबंदीमुळे यंदा वीजविक्रीतून मिळणारा महसूल घटला असल्याने सद्य:स्थितीत ही रक्कम देता येणार नाही, असे व्यवस्थापनाने स्पष्ट के ले. त्यामुळे १४ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजल्यापासून संप करण्याचा निर्णय कामगार संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला असून गुरुवारपासून राज्यभर निदर्शने सुरू झाली. वीज कर्मचाऱ्यांची सेवा अत्यावश्यक सेवेंतर्गत येत असल्याने राज्यातील ग्राहकांचा वीजपुरवठा संपामुळे खंडित होऊ नये यासाठी मेस्मा लावला जाण्याची शक्यता असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा