Advertisement

शिक्षक ओरडले म्हणून १३ वर्षीय मुलीनं केली आत्महत्या


शिक्षक ओरडले म्हणून १३ वर्षीय मुलीनं केली आत्महत्या
SHARES

मुंबईतील सायन कोळीवाडा परिसरात एका १३ वर्षीय मुलीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जुली महेंद्र शर्मा असं या मुलीचं नाव अाहे. शाळेतील शिक्षकांनी वर्गातील विद्यार्थ्यांसमोर ओरडल्यामुळे तिने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे.


नेमकं काय झालं?

सायन कोळीवाडा परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर इथं जुली आपल्या आई-वडीलांसोबत राहत होती. के. डी. गायकवाड हिंदी मीडियम स्कूल या शाळेत जुली शिकत होती. शनिवारी संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर जुली घरी रडत आली. त्यावेळी कुटुंबीयांनी जुलीला विचारलं असता तिनं शाळेतील शिक्षक अनिल पाल यांनी सर्वांसमोर आपल्याला ओरडल्याचं सांगितलं.


'अशी' केली आत्महत्या

यानंतर कुटुंबीयांनी जुलीला शांत केलं होतं. मात्र काही वेळानंतर तिनं घरातील दुसऱ्या खोलीत जाऊन गळफास लावून आत्महत्या केली. जुलीनं आत्महत्या केल्याचं समजताच शेजाऱ्यांनी तातडीनं तिला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. परंतु रुग्णालयातील डॉक्टरांना अगोदरचं मृत्यू झाल्याचे घोषित केलं.हेही वाचा-

दाभोलकर हत्या प्रकरण: आरोपींना १२ आॅक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी

#Metoo: नाना पाटेकरनंतर कैलाश खेर, विकास बहल यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोपRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा