Advertisement

#Metoo: नाना पाटेकरनंतर कैलाश खेर, विकास बहल यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप


#Metoo: नाना पाटेकरनंतर कैलाश खेर, विकास बहल यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप
SHARES

अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर बाॅलिवूडमध्ये पुन्हा #Metoo कॅम्पेन सुरू झालं आहे. नानापाठोपाठ आता गायक कैलाश खेर आणि दिग्दर्शक विकास बहल यांच्यावर देखील लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांमुळे बाॅलिवूड चांगलंच ढवळून निघालं आहे.


कैलाश खेर यांचं प्रकरण काय?

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, एका फोटो जर्नलिस्ट महिलेने ट्विटरवरून गायक कैलाश खेर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. २००६ मध्ये ही महिला कैलाश खेर यांचं फोटो शूट करण्यासाठी गेली असता, हा प्रकार झाला. या महिलेची जोडीदार आणि पीडित महिला एका सोफ्यावर बसलेले असताना खेर दोघींच्याही मध्ये बसले आणि बोलाताना दोघींच्याही मांड्यांवर हात ठेवू लागले. जोडीदार महिलेने हा प्रकार आपल्या रिपोर्टमध्ये देण्याची सूचनाही तिला केली होती. परंतु वृत्तपत्रात अशा अँगलची बातमी छापण्यात येणार नाही, याची माहिती असल्याने पीडित महिलेने तसं केलं नाही, असं तिने आपल्या ट्विटरवर लिहिलं आहे.


विकास बहल यांचं प्रकरण काय?

अशाच एका प्रकारात विकास बहल यांचंही नाव समोर आलं आहे. २०१५ मध्ये 'बाॅम्बे वेलवेट' सिनेमाच्या प्रमोशन टूअरमधील एका सदस्य महिला सदस्याने विकासवर छेडछाडीचा आरोप केला. विकासने या सिनेमाची निर्मिती केली होती.

पीडित महिलेने एका मीडिया पोर्टलशी बोलताना सांगितलं की, हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधी एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. पार्टी संपल्यानंतर विकासने पीडित महिलेला तिच्या रूमपर्यंत सोडण्यास येतो असं सांगितलं. विकास या सिनेमाचा निर्माता असल्याने ती त्याला नाकारू शकली नाही. रूमपर्यंत पोहोचल्यावर विकासने तिला मिठी मारली. हा प्रकार झाल्यावर महिला आपल्या रूमच्या बाथरूममध्ये गेली.

बाथरूममधून बाहेर आल्यावर विकास तिच्या बेडवर झोपल्याचं तिला दिसलं. तिने विकासला रूममधून बाहेर जाण्यास सांगितलं. पण विकास गेला नाही. उलट अंगातील कपडे काढून तिच्यासमोर हस्तमैथून केल्याचा आरोप तिने केला. याप्रकरणी पीडित महिलेने अनुराग कश्यपकडे तक्रार केल्यावर त्यानेही त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याचं तिने म्हटलं.


कंगनाचाही आरोप

क्वीन सिनेमाच्या शुटींगदरम्यान देखील विकासने आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्री कंगना रनौतने केला आहे. विकास या सिनेमाच्या शुटींगच्यावेळेस आपण अनेक महिलांसोबत सेक्स केल्याच्या बढाया कंगनासमोर मारायचा. एवढंच नव्हे, तर जेव्हा जेव्हा कंगना समोर यायची तेव्हा तिला जोरदार आलिंगन द्यायचा. हे आलिंगन इतकं घट्ट असायची की त्याला बाजूला करण्यासाठी कंगनाला जोर लावावा लागायचा, असा आरोप कंगनाने केला आहे.



हेही वाचा-

तनुश्री दत्ताची नानाविरोधात ओशिवरा पोलिसांत तक्रार

नाहीतर, बिग बाॅस बंद पाडू- अमेय खोपकर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा