Advertisement

परळमधली अनोखी पर्यावरण जत्रा


SHARES

आजवर आपण अनेक जत्रा पहिल्या असतील. त्या जत्रेत सहभागी होऊन विविध खेळ खेळला असाल, मौजमजा केली असेल. पण परळ पूर्वेकडे एक अशी जत्रा भरली होती, ज्यात मौजमजेसोबतच समाजप्रबोधनाचेही काम करण्यात आले. या जत्रेचे नाव होते 'पर्यावरण जत्रा'.


सहाय्यक आयुक्तांची शक्कल

परळच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील महापालिकेच्या एफ/ दक्षिण विभागात सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी अनोखी शक्कल लढवत ही 'पर्यावरण जत्रा' भरवली होती. या जत्रेतील प्रमुख आकर्षण होते इथला 'बोलका पोपट'.




पर्यावरणावर आधारीत भविष्य

या जत्रेत येणाऱ्या प्रत्येकाची भेट घेऊन हा 'बोलका पोपट' पर्यावरणाच्या महत्त्वातून त्याचे भविष्य सांगत होता. ही अतिशय मजेशीर आणि गमतीदार जत्रा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच पसंतीस उतरली.


अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन

शहरीकरणाच्या जंगलात हरवलेली निसर्गाची साथ, डेंग्यू, मलेरिया सारख्या भयंकर आजारांची समस्या, प्रदूषणाची समस्या इ. प्रश्न सोडवण्यासाठी या जत्रेत 7 स्टॉल उभारण्यात आले होते.

या स्टॉलमध्ये टाकाऊ पासून टिकाऊ, आरोग्य, ओला व सुका कचरा वर्गीकरणाची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर वस्तू आणि वास्तुचे महत्व, वेळेत काळजी न घेतल्याने भविष्यात होणारे आजार व त्यावर उपचार पद्धती, असे वेगवेगळे स्टॉल व प्रत्येकाची प्रतिकृती साकारण्यात आली.



जनजागृतीपर संदेश

वरदा आर्ट या संस्थेला जत्रेच्या सजावटीचे काम देण्यात आले होते. या संस्थेने जत्रेची सजावट करताना संदेश छत्र्यांवर रेखाटलेले जनजागृतीपर संदेश सर्वांच्याच आकर्षणाचा विषय ठरला.



असे होते स्टॉल

  • मनाची श्रीमंती - वापरात नसलेले जुने कपडे व वस्तू इतरांना देण्यासाठी
  • आपलं परळ - जुन्या पुरातन वस्तू व इमारतींच्या छायाचित्रांचे प्रदर्शन
  • ओला व सुका कचरा वर्गीकरण - हरित कचऱ्यापासून हरित संपत्ती व त्याचे फायदे
  • आरोग्य - डेंग्यू, मलेरिया, कावीळ इ. पावसाळी आजार रोखण्यासाठी
  • अवयव दान, पल्स पोलिओबाबतची माहिती
  • टाकाऊ पासून टिकाऊ - काच, प्लस्टिकच्या बाटल्यांपासून तयार केलेल्या शोभेच्या वस्तू
  • पर्यावरण टॅटू - झाड, पक्षी, प्राणी इ. टॅटूचे गोंदण



शिवडी कोळीवाडा येथील मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम व स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी पथनाट्य सादर केले. त्यात स्वच्छता राखा आणि निरोगी जीवन जागा, उघड्यावर शौच करू नये, असे आवाहन करण्यात आले.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा