स्वच्छतेबाबत जनजागृती वाहनाचं उद्घाटन

 Goregaon
स्वच्छतेबाबत जनजागृती वाहनाचं उद्घाटन
स्वच्छतेबाबत जनजागृती वाहनाचं उद्घाटन
See all

गोरेगाव - स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी पालिकेच्या सहकार्यानं सुका कचरा वाहन व्यवस्था या उपक्रमाचं उद्घाटन मंगळवारी करण्यात आलं. स्नेहदीप पहाडी स्कूल रोड, आरे रोड, गोरेगाव पूर्व येथे शिवसेना नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. या वेळी शिवसेना उपनेते आणि महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अरफात शेख उपस्थित होते.

Loading Comments