SHARE

वेस्टर्न इंडिया अाॅटोमोबाईल असोसिएशनतर्फे (डब्ल्यूअायएए) २५ मार्च २०१८ रोजी 'वुमन्स कार रॅली अाॅफ द व्हॅली'चे अायोजन करण्यात अाले अाहे. खास महिलांसाठी असलेल्या या प्रचंड लोकप्रिय स्पर्धेचे हे १० वे वर्ष असून या रॅलीद्वारे महिलांच्या सुरक्षिततेचा संदेश दिला जाणार अाहे. अांतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतानाच महिलांच्या सुरक्षिततेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी ही रॅली अायोजिच करण्यात येते, असे डब्ल्यूअायएएचे कार्यकारी अध्यक्ष नितीन डोसा यांनी सांगितले. या रॅलीमध्ये शहरातील ८०० ते १००० महिला सहभागी होणार असून जवळपास २०० कार धावणार अाहेत.सुरुवात कुठून? 

महिलांसाठी असलेल्या या रॅलीची सुरुवात रविवारी २५ मार्च रोजी एनएससीअाय स्टेडियम येथून होईल. त्यानंतर हाजी अली, पेडर रोड, गिरगांव चौपाटी, मरिन ड्राइव्ह, चर्चगेट या एेतिहासिक स्थळांना भेट देऊन ही रॅली पुण्यातील लवासाच्या दिशेने कूच करेल. महिला स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी विविध सेलिब्रेटी उपस्थित राहणार अाहेत. 


बक्षिसे किती?

'वुमन्स कार रॅली अाॅफ द व्हॅली'त प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्याला एक लाख रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येईल. उपविजेत्याला ७५ हजार रुपयांचे तर तृतीय क्रमांक पटकावणाऱ्याला ५० हजार रुपयांचे बक्षिस देण्यात येईल. सर्वोत्तम सजवलेली कार, सर्वोत्तम नटलेली टीम, सर्वोत्तम संदेश देणारी कार, सर्वोत्तम स्लोगन, सर्वाधिक हौशी टीम किंवा सर्वाधिक वयस्कर स्पर्धक या सर्वांना पारितोषिके दिली जाणार अाहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या