Advertisement

पुनर्वसनाबाबत आदिवासी अंधारात


SHARES

गोरेगाव - ऐकलात हा आक्रोश? गोरेगाव आरे कॉलनीतल्या युनिट सतरामध्ये राहणाऱ्या आदिवासींचा हा आक्रोश आहे. या भागातच फोर्स वन पथक आहे. बंदुकांसह या पथकाच्या चाललेल्या हालचालींमुळे मोकळेपणानं जगण्याची सवय असलेल्या आदिवासींना गुदमरल्यासारखं होतंय. 26/11च्या हल्ल्यानंतर मुंबईच्या रक्षणासाठी फोर्स वनची स्थापना करण्यात आली. पण या पथकामुळे आदिवासींना मात्र एखाद्या तुरुंगात असल्यासारखं वाटतंय...फोर्स वन या दहशतवाद विरोधी पथकाला सरावासाठी जागा आवश्यक होती. मुंबईत ती मिळणं शक्यच नव्हतं. म्हणूनच आरे कॉलनीतली 98 एकर जागा निवडण्यात आली. मात्र त्यामुळे इथले मूळ रहिवासी असलेल्या आदिवासींच्या अडचणी वाढल्या. स्थानिक आमदार आणि गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर आता या आदिवासींच्या पाठीशी उभे राहिलेत. आदिवासींचाही विकास व्हावा, हे कुणीच नाकारणार नाही. पण अस्तित्वच धोक्यात आणणारा विकास तरी काय कामाचा...

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा