Advertisement

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची ताज हॉटेलकडून राहण्याची व्यवस्था

मुंबई महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची ताज हॉटेलकडून राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची ताज हॉटेलकडून राहण्याची व्यवस्था
SHARES

मुंबई महापालिकेच्या  अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची ताज हॉटेलकडून राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.  लॉकडाऊनमुळे पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामावर पोहोचण्यात अडचणी येत आहेत. प्रवासादरम्यान डॉक्टर, नर्स, कर्मचारी आदींना संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे  'ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स'ने स्वत:हून महापालिका आयुक्तांशी संपर्क साधून विनाअट मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. महापालिका जे दर निश्‍चित करेल, ते मान्य असतील, असं ताज ग्रुपने सांगितलं आहे.

गेटवे ऑफ इंडियाजवळील ताज हॉटेलमध्ये एका खोलीसाठी दिवसाला १० ते १५ हजार रुपये आकारले जाते. त्या खोलीसाठी दिवसाला दोन व्यक्ती राहण्यासाठी महापालिकेने दोन हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली आहे. महापालिकेने प्रतिमाणशी प्रतिदिवस एक हजार रुपये असा दर ठरवला आहे. हा दर ताज ग्रुपने विनाअट स्वीकारला. या दरात निवास, न्याहारी, दोन्ही वेळचे जेवण व कपडे धुण्याची व्यवस्था इत्यादीचा समावेश आहे.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इतर हॉटेलांमध्ये देखील खोली नोंदणी करण्याची कार्यवाही करण्यासाठी परिपत्रक काढण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार सहआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) रमेश पवार यांनी एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार हॉटेलमधील प्रत्येक खोलीत दोन व्यक्ती राहतील, या पद्धतीने निर्धारित केलेले दर नमूद केले आहेत. या परिपत्रकान्वये पंचतारांकित हॉटेलसाठी प्रतिदिन रुपये दोन हजार, चार तारांकित हॉटेल साठी एक हजार ५००, तीन तारांकित हॉटेल असल्यास एक हजार; तर विना तारांकित हॉटेल असल्यास ५०० रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. या रकमेत दोन व्यक्तींच्या निवासासह न्याहारी, दोन्ही वेळचे जेवण व लॉन्ड्री सर्विसचा समावेश आहे. या रकमेत करांचा समावेश नाही.



हेही वाचा -

मुंबई, पुण्यातील रेड झोनमध्येही ४ मेपासून मद्यविक्री सुरू

तर, ११ लाख परप्रांतीयांना सोडण्यासाठी लागतील इतक्या ट्रेन आणि बस..




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा