Advertisement

फक्त मुलगीच! मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन करण्यात मुंबई अव्वल

भारतीय कुटुंबांत मुलगाच हवा हा अट्टाहास कमी झाल्याचं चित्र सध्या समाजात पाहायला मिळत आहे.

फक्त मुलगीच! मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन करण्यात मुंबई अव्वल
SHARES

भारतीय कुटुंबांत मुलगाच हवा हा अट्टाहास कमी झाल्याचं चित्र सध्या समाजात पाहायला मिळत आहे. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सेसच्या संशोधनातील निष्कर्षांतून या बदलाचे संकेत मिळाले आहेत. संशोधनाचे नेतृत्व मुंबईच्या लोकसंख्याशास्त्र संस्थेचे प्रा. हरिहर साहू यांनी केलं.

हरिहर यांनी सांगितलं की, १९९२ ते २०१६ पर्यंतच्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात सहभागी ८ लाख ८८ हजार कुटुंबांतील ९ लाख ९९ हजार विवाहित महिलांशी झालेल्या चर्चेतून हा निष्कर्ष समोर आला. या कुटुंबांचे वर्गीकरण ग्रामीण आणि शहरी तसंच निरक्षर, प्राथमिक, उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षण, धार्मिक आणि जातीय आधारावर करण्यात आलं आहे.

सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार, दोन मुली आणि मुलगा नसलेल्या ३३.६% घरांत कुटुंब नियोजनाच्या पद्धतींचा अवलंब झाला किंवा कुटुंब दोन मुलींपुरतेच सीमित ठेवण्याचा निर्णय झाला. फक्त मुली असलेले कुटुंबच उच्च शिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न असल्याचा या तीन दशकांतील शोधाचा महत्त्वाचा निष्कर्ष आहे.

गावांच्या तुलनेत शहरांमध्ये एक मुलगी असलेली कुटुंबे २५% जास्त

  • अल्पशिक्षित कुटुंबांच्या तुलनेत उच्च शिक्षित कुटुंबांत फक्त मुलीच असलेले कुटुंब मर्यादित ठेवण्याची इच्छा १.६ ते २.२ पट जास्त आढळली.
  • शहरांच्या तुलनेत गावांत राहणाऱ्या दांपत्यांत फक्त मुलीपर्यंतच कुटुंब मर्यादित ठेवण्याची इच्छा २५% कमी.
  • महाराष्ट्र, केरळ आणि प. बंगालच्या मुस्लिम कुुटुंबांत हिंदूंच्या तुलनेत फक्त मुली असलेली कुटुंबं अनुक्रमे २६%, ३५% आणि ३७% कमी आढळली.
  • महाराष्ट्रात एक मुलगी असलेली कुटुंबं २६%, दोन मुलींची कुटुंबं ६३.४% आणि तीन मुलींची कुटुंब ७१.५% आहेत.

१० वर्षांत या राज्यांत झाली सर्वाधिक वाढ

  •  केरळ  १६.८%
  •  तामिळनाडू १०.८%
  •  हरियाणा २०%
  •  महाराष्ट्र १०%
  •  पंजाब ८%



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा