Advertisement

बीएमसीची अनधिकृत पार्किंगवर कारवाई, ३ दिवसात 'इतका' दंड वसूल

वाहतूककोंडीची समस्या वाढत असल्याने पालिकेच्या २३ सार्वजनिक वाहनतळांलगतच्या पाचशे मीटर परिसरातील अनधिकृत पार्किंगवर जुलै महिन्यात कारवाईला सुरुवात झाली. अनधिकृत पार्किंगसाठी १० हजार रुपये दंड करण्यात येत आहे.

बीएमसीची अनधिकृत पार्किंगवर कारवाई, ३ दिवसात 'इतका' दंड वसूल
SHARES

मुंबई महापालिकेने (बीएमसी) रस्त्यावर अनधिकृतपणे उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. याअंतर्गत बीएमसीने ३ दिवसात १३६ वाहनांवर कारवाई केली आहे. या कारवाईतून पालिकेने ८ लाख ८९ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

 वाहतूककोंडीची समस्या वाढत असल्याने पालिकेच्या २३ सार्वजनिक वाहनतळांलगतच्या पाचशे मीटर परिसरातील अनधिकृत पार्किंगवर जुलै महिन्यात कारवाईला सुरुवात झाली. अनधिकृत पार्किंगसाठी १० हजार रुपये दंड करण्यात येत आहे. पालिकेने पाच महत्त्वाच्या रस्त्यांलगतच्या अनधिकृत पार्किंगवर कारवाई सुरू केली. १८ ते २० नोव्हेंबर या तीन दिवसांमध्ये १३६ वाहनचालकांकडून ८ लाख ८९ हजार ४३५ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये ३९ अवजड वाहने, ७९ चार चाकी, ५ तीन चाकी आणि एका दुचाकीवर कारवाई करण्यात आली. 

दक्षिण मुंबईतील महर्षी कर्वे मार्ग व गोखले मार्ग, पूर्व उपनगरातील लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि पश्चिम उपनगरातील स्वामी विवेकानंद मार्ग व न्यू लिंक रोड या पाच महत्त्वाच्या रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंगवर बीएमसीने कारवाई केली आहे. 


हेही वाचा -

मुंबईत शिवसेनाच किंग, किशोरी पेडणेकर बनल्या नव्या महापौर

धक्कादायक! मुंबई महिलांसाठी असुरक्षितच, वाढले 'एवढे' गुन्हे




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा