Advertisement

मुंबईत शिवसेनाच किंग, किशोरी पेडणेकर बनल्या नव्या महापौर

मुंबईच्या नव्या महापौर म्हणून शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका ​किशोरी पेडणेकर​​​ यांची शुक्रवारी बिनविरोध निवड करण्यात आली.

मुंबईत शिवसेनाच किंग, किशोरी पेडणेकर बनल्या नव्या महापौर
SHARES

मुंबईच्या नव्या महापौर म्हणून शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची शुक्रवारी बिनविरोध निवड करण्यात आली. तर अॅड सुहास वाडकर यांची उपमहापौर म्हणून निवड झाली. भाजप, काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेस यापैकी एकाही पक्षाने या निवडणुकीत आपला उमेदवार उभा न केल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. परिणामी शिवसेनेचं मुंबई महापालिकेतील वर्चस्व कायम राहिलं आहे.  

मुंबई महापालिकेत शिवसेनेचे ९४, भाजपचे ८३, काँग्रेसचे २९, राष्ट्रवादी काँग्रेसचे ८, सपाचे ६, एमआयएमचे २ तर मनसेचा १  नगरसेवक आहे. 

हेही वाचा- शिवसेनेच्या व्यासपीठावर अवतरले आव्हाड, ठाण्याच्या महापौरांना दिल्या शुभेच्छा

शुक्रवारी सकाळी ११ वाजता मुंबई महापालिका मुख्यालयात महापौर विश्वानाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक झाली. निवडणूक झाल्यानंतर आता नवनिर्वाचीत महापौर आणि उपमहापौर हुतात्मा चौकात जाऊन अभिवादन करणार आहेत. त्यासाठी हुतात्मा चौक इथं मंडप देखील उभारण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसंच युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे देखील या ठिकाणी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 

महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत शिवसेनेविरोधात उमेदवार उभा करणार नाही, अशी भूमिका भाजपने आधीच घेतली होती. त्यामुळे या निवडणुकीत फोडाफोडीचं राजकारण होण्याची शक्यता मावळली होती. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापन होण्याची दाट शक्यता असल्याने या दोन्ही पक्षांनी देखील आपला उमेदवार न उतरवण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. 



हेही वाचा- 

शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर होणार मुंबईच्या नव्या महापौर

आता इंद्रपद दिलं, तरी माघार नाही- संजय राऊत



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा