Advertisement

आता इंद्रपद दिलं, तरी माघार नाही- संजय राऊत

आता कुणी मुख्यमंत्रीपद काय, तर इंद्रपद दिलं तरी माघार घेणार नाही, अशी रोखठोक भूमिका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मांडली.

आता इंद्रपद दिलं, तरी माघार नाही- संजय राऊत
SHARES

भाजपने शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची आॅफर दिल्याची चर्चा सुरू असताना आता कुणी मुख्यमंत्रीपद काय, तर इंद्रपद दिलं तरी माघार घेणार नाही, अशी रोखठोक भूमिका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मांडली. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, येत्या दोन दिवसांत राज्यातील चित्र स्पष्ट होईल. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान होईल आणि तो ५ वर्षे असेल. शिवसेनेने स्वाभिमानाने घेतलेला हा निर्णय आहे. त्याला तिन्ही पक्षप्रमुखांनी सहमती दर्शवली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी, अशी तमाम शिवसैनिकांची इच्छा आहे. या इच्छेचा मान ते ठेवतील, अशी अपेक्षा आहे. 

दरम्यान गुरूवारी रात्री उशीरा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली. या बैठकीत सरकार स्थापण्यावर सकारात्मक निर्णय झाल्याचं म्हटलं जात आहे. तसंच सकाळी शिवसेनेच्या बैठकीआधी देखील उद्धव ठाकरेंनी पवार यांच्या सिल्हर ओक निवासस्थानी जाऊन बैठक घेतली. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि संजय राऊत देखील होते. ही बैठक सकारात्मक झाल्याचे संकेत राऊत यांनी बाहेर आल्यावर दिले. 


हेही वाचा-

भाजपाची नवी खेळी, शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाची आॅफर

शिवसेनेच्या व्यासपीठावर अवतरले आव्हाड, ठाण्याच्या महापौरांना दिल्या शुभेच्छासंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा