Advertisement

भाजपाची नवी खेळी, शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाची आॅफर

आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार येणं हे निश्चित झालं आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपाने नवी खेळी केली आहे.

भाजपाची नवी खेळी, शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाची आॅफर
SHARES

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार येणं हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे आता भाजपाने एक पाऊल मागं घेत नवी खेळी केली आहे. शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचा प्रस्ताव दिला आहे. भाजपाच्या एका नेत्याने मातोश्रीला हा प्रस्ताव दिला असून आता शिवसेनेच्या उत्तराची भाजपाला अपेक्षा आहे. 

समान सत्ता वाटपाच्या मुद्यावर भाजपा आणि शिवसेनेची युती तुटली.  शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद अडीच वर्ष वाटून घेण्याची चर्चा झाली असल्याचं म्हटलं होतं. मात्र शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याची कुठलीच चर्चा झाली नसल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी समान सत्ता वाटपास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या उद्धव ठाकरे यांनी भाजपाशी चर्चा करण्यास नकार दिला. भाजपा नेत्यांनी आपल्याला खोटं पाडल्याचं म्हणत उद्धव यांनी चर्चेची दारे बंद केली. 

आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार येणं हे निश्चित झालं आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपाने नवी खेळी केली आहे. शिवसेनेला सुरूवातीची अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याची तयारी भाजपाने दाखवली आहे. भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने गुरूवारी रात्री मातोश्रीची संपर्क साधून ही नवी आॅफर दिली आहे. मात्र, शिवसेनेकडून त्यावर कसलाही प्रतिसाद मिळालेला नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आता सत्ता स्थापनेचं सुत्रही निश्चित झालं आहे. त्यामुळे आता शिवसेनेला माघार घेणं शक्य नसल्याचं समोर येत आहे.



हेही वाचा  -

शिवसेनेच्या आमदारांना जायचंय गोव्याला




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा