Advertisement

शिवसेनेच्या आमदारांना जायचंय गोव्याला

मुंबईत शिवसेनेच्या सर्व आमदारांसोबत बैठक घेतल्यानंतर त्यांना जयपूरला रवाना करण्यात येणार असल्याचं समजत आहे.

शिवसेनेच्या आमदारांना जायचंय गोव्याला
SHARES

राज्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी आपल्या सर्व आमदारांना शुक्रवारी मुंबईत बोलवून घेतलं आहे. मुंबईत शिवसेनेच्या सर्व आमदारांसोबत बैठक घेतल्यानंतर त्यांना जयपूरला रवाना करण्यात येणार असल्याचं समजत आहे. परंतु या आमदारांना गोव्याला जायचं असल्याची इच्छा शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली आहे. 

हेही वाचा- शिवसेनेच्या व्यासपीठावर अवतरले आव्हाड, ठाण्याच्या महापौरांना दिल्या शुभेच्छा

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापण्यासंदर्भात दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पूर्ण झाली असून या बैठकीत सर्व मुद्यांवर एकमत झाल्याची माहिती गुरूवारी संध्याकाळी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. या भेटीनंतर नव्या सरकार स्थापनेची घोषणा होऊन तिन्ही पक्षाचे नेते सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांची भेट घेतील, असं म्हटलं जात आहे.

तत्पूर्वी काँग्रेस आणि शिवसेनेने आपापल्या आमदारांना मुंबईत बोलवून घेतलं आहे. काँग्रेसच्या बैठकीत विधीमंडळ गटनेत्याची निवड होण्याची अपेक्षा आहे. तर शिवसेनेच्या बैठकीत पक्षप्रमुखांकडून सत्ता स्थापनेवर मार्गदर्शन होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांना पॅन कार्ड, आधारकार्डासह मुंबईत बोलवण्यात आलं आहे. त्यानंतर त्यांना जयपूरला पाठवण्यात येणार आहे.

त्यावर बोलताना सत्तार म्हणाले, मी सर्व कागदपत्रांसह मुंबईत दाखल झालो आहे. गेल्या वेळेस आम्हाला मुंबईतील हाॅटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. परंतु एकाच ठिकाणी राहून आम्हाला कंटाळा आला होता. यावेळेस आम्हाला जयपूरला पाठवण्यात येईल, असं म्हटलं जात आहे. तर काही आमदारांना गोव्याला जाण्याची इच्छा आहे. 

ही इच्छा शिवसेनेकडून पूर्ण होते की नाही हे शुक्रवारच्या बैठकीनंतरच कळणार आहे. हेही वाचा- 

आता चर्चा शिवसेनेसोबत, पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती

आता चर्चा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोण होणार याची?संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा