Advertisement

आता चर्चा शिवसेनेसोबत, पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती

दोन्ही काँग्रेसचे नेते मिळून ​शिवसेनेसोबत​​​ चर्चा करतील आणि अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

आता चर्चा शिवसेनेसोबत, पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती
SHARES

महाराष्ट्रात सरकार स्थापनेसंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्व स्तरातील चर्चा पूर्ण झाली आहे. यापुढं दोन्ही काँग्रेसचे नेते मिळून शिवसेनेसोबत चर्चा करतील आणि अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक देखील होते.

हेही वाचा- आता चर्चा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोण होणार याची?

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रात पर्यायी सरकार स्थापन करायचं की नाही याविषयी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मिळून चर्चा केली. आम्ही एकत्र विधानसभा निवडणूक लढवली असल्याने विविध मुद्द्यांवर आमचं एकमत होणं अपेक्षित होतं. त्यानुसार दोन्ही पक्षातील चर्चा संपलेली असून दोन्ही पक्ष मिळून मुंबईत शिवसेनेच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. त्या चर्चेत तिन्ही पक्षांचं एकमत झाल्यास अंतिम निर्णय घेण्यात येईल.

हेही वाचा-  ‘या’ पक्षाला मिळणार इतकी मंत्रीपदं

त्यानुसार शुक्रवारी काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. सोबतच दोन्ही काँग्रेस मिळून स्वाभीमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष आणि रिपाइं(कवाडे) या आपल्या मित्रपक्षांसोबत देखील चर्चा करून त्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना मुंबई बोलवलं असून याच दिवशी काँग्रेसचा विधीमंडळ गटनेता देखील ठरवण्यात येणार आहे.हेही वाचा-

शिवसेनेसोबत जाणे म्हणजे स्वतःला दफन करून घेणे; संजय निरुपम

‘सेक्युलर’ शब्द घटनेतच, शिवसेनेला कुणीही शिकवू नये- राऊतRead this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा