Advertisement

‘सेक्युलर’ शब्द घटनेतच, शिवसेनेला कुणीही शिकवू नये- राऊत

शिवसेना देशाच्या घटनेचा आदर करणारी असल्याने चर्चेचा प्रश्नच कुठं येतो, असं म्हणत शिवसेना नेते खासदार ​संजय राऊत​​​ यांनी गुरूवारी टीकाकारांना उत्तर दिलं.

‘सेक्युलर’ शब्द घटनेतच, शिवसेनेला कुणीही शिकवू नये- राऊत
SHARES

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार स्थापन होण्याचं जवळपास निश्चित झालं आहे. अशा स्थितीत हिंदुत्ववादी विचारसरणीची शिवसेना सेक्युलर विचारसणीच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत कसं जुळवून घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

त्याला उत्तर देताना आपला देश आणि देशाची घटना सेक्युलर संकल्पनेवर आधारीत आहे. शिवसेना देशाच्या घटनेचा आदर करणारी असल्याने चर्चेचा प्रश्नच कुठं येतो, असं म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी गुरूवारी टीकाकारांना उत्तर दिलं.

हेही वाचा- आघाडीच्या नेत्यांची उद्धव ठाकरेंशी चर्चा- संजय राऊत

आपला देश आणि देशाची घटना सेक्युलर या संकल्पनेवर आधारीत आहे. कुणालाही मदत करताना जात-धर्म-पंथ पाहून मदत केली जात नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनीदेखील सर्व धर्मियांना एकत्र घेऊनच राज्य स्थापन केलं होतं. आम्ही देशाच्या घटनेचा आदर करतो. त्यामुळे सेक्युलर या शब्दावर अधिक बोलण्याची गरज नाही.

तसंच शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे देशातील एकमेव नेते आहेत. ज्यांनी न्यायालयात कुराण, भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेण्याऐवजी संविधानावर हात ठेवून शपथ घेण्यास सांगितलं होतं. तेव्हा शिवसेनेला कुणीही शिकवू नये, असंही संजय राऊत म्हणाले.हेही वाचा- 

शिवसेनेसोबत जाणे म्हणजे स्वतःला दफन करून घेणे; संजय निरुपम

अपमानित करण्यासाठी जागा बदलली? राऊतांचं थेट उपराष्ट्रपतींना पत्रसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा