Advertisement

आघाडीच्या नेत्यांची उद्धव ठाकरेंशी चर्चा- संजय राऊत


आघाडीच्या नेत्यांची उद्धव ठाकरेंशी चर्चा- संजय राऊत
SHARES

राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच अद्याप सुटत नाही आहे. सत्तास्थापनेसाठी सर्व राजकीय पक्ष नेत्यांच्या बैठकाही घेत आहेत. मात्र, असं असलं तरी 'राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होईल', असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. त्याशिवाय, येत्या २ दिवसांमध्ये सत्तास्थापनेवर अंतिम निर्णय होईल, असंही मत राऊत यांनी गुरूवारी झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केलं.

सकारात्मक चर्चा

'राज्यात १ डिसेंबरपूर्वी सरकार स्थापन होईल. बुधवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पार पडलेली बैठक ही सकारात्मक झाली. सरकार स्थापनेसंदर्भात त्यांनी काही निर्णय घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. बैठकीनंतर आघाडीच्या काही नेत्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे आणि लवकरच शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन होईल’, असं शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं.

हेही वाचा - काँग्रेसच्या ‘या’ नेत्याने घेतली राऊतांची भेट

समान कार्यक्रमावर बैठक

'काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बुधवारी बैठका झाल्या. त्या बैठकांमध्ये काय चर्चा झाली याबाबत मी वक्तव्य करणं योग्य नाही. परंतु या बैठकीत सरकार स्थापनेसंदर्भात काही निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. किमान समान कार्यक्रमावर ही बैठक आधारीत होती. ही बैठक सकारात्मक झाली असून, येत्या दोन दिवसांमध्ये यावर अंतिम निर्णय होईल. राज्यात स्थिर सरकार आणण्यासाठी तिन्ही पक्ष आग्रही आहेत. यापुढील सर्व निर्णय हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतले जाणार आहेत’, असंही राऊत यांनी म्हटलं.

हेही वाचा - महाशिवआघाडीला सोनियांची मंजुरी?

शुक्रवारी मुंबईत बैठक

डिसेंबर महिना उजाडण्यापूर्वी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन होईल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांची शुक्रवारी मुंबईत बैठक होईल. आम्हाला ५ वर्ष सरकार चालवायची आहे. काँग्रेसचे नेतेही बैठकांसदर्भातील माहिती काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना देत आहे. सध्या तरी त्यांची भेट घेण्याचं कोणतही नियोजन नसल्याचंही राऊत यांनी स्पष्ट केलं.हेही वाचा -

हार्बर सेवेचा लवकरच बोरिवलीपर्यंत विस्तार

आर्थिक मदत मिळत नसल्यानं मच्छिमार राज्यपालांवर नाराजसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा