Advertisement

आर्थिक मदत मिळत नसल्यानं मच्छिमार राज्यपालांवर नाराज

२१ नोव्हेंबर हा जागतिक मच्छिमार दिन आहे. या दिनानिमित्तानं राज्यपालांनी मदत घोषित करण्याची मच्छिमारांची मागणी आहे.

आर्थिक मदत मिळत नसल्यानं मच्छिमार राज्यपालांवर नाराज
SHARES

राज्यभरातील अनेक भागात पडलेल्या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानामुळं त्यांना आर्थिक संकटावा सामोरं जावं लागतं आहे. त्यामुळं या शेतकऱ्यांना मदत मिळावी आणि ओला दुष्काळ पडल्यानं शेतीचे नुकसान भरून काढण्यासाठी राज्यपालांनी शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज घोषित केलं आहे. परंतु, या पावसामुळं मच्छिमारांचंही मोठ्या प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळं राज्यपालांची मच्छिमारांनाही मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, ही मदत न केल्याबद्दल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीनं नाराजी व्यक्त केली आहे.

मच्छिमार दिन

२१ नोव्हेंबर हा जागतिक मच्छिमार दिन आहे. या दिनानिमित्तानं राज्यपालांनी मदत घोषित करावी, अशी मागणी कृती समितीनं केली आहे. त्यामुळं आता शेतकऱ्यांप्रमाणं राज्यपाल मच्छिमारांही मदत करणार का याकडं सर्व मच्छिमारांचं लक्ष लागून राहिलं आहे.

मच्छिमारांची स्थिती भीषण

यंदा पावसाचा जोर अधिक व सातत्यानं अरबी समुद्रात चक्रीवादळ असल्यानं मच्छिमाराचा ४ महिन्यांचा काळ वाया गेला. त्यामुळं मच्छिमारांची स्थिती भीषण आहे. त्यांचंही शेतकऱ्यांसारखंच नुकसान झालं आहे. त्यामुळं मच्छिमारांनाही तात्काळ मदत जाहिर करावी, अशी मागणी राज्यपालांकडं जात केली आहे. राज्यपाल सचिवालयानं त्या संबंधीचे पत्र मत्स्य व्यवसाय विभागाच्या सचिवांना पाठवलं आहे.



हेही वाचा -

लोकलमधील हल्ल्यातील जखमी महिला प्रवाशांना मिळणार आर्थिक मदत?

मानसिक आजारांवर आधारित मानसशास्त्रीय भय पुस्तक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा