लोकलमधील हल्ल्यातील जखमी महिला प्रवाशांना मिळणार आर्थिक मदत?

हल्ल्यांत जखमी होणाऱ्या महिला प्रवाशांना आर्थिक मदत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकलमधील हल्ल्यातील जखमी महिला प्रवाशांना मिळणार आर्थिक मदत?
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर अनेकदा हल्ले केले जातात. विशेष म्हणजे धावत्या लोकलमधील महिला डब्यावर अधिक हल्ले होत असतात. त्यामुळं या हल्ल्यांत जखमी होणाऱ्या महिला प्रवाशांना आर्थिक मदत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अद्याप या हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना आर्थिक मदत देण्याची तरतूद रेल्वे प्रशासनाकडं नाही आहे. त्यामुळं यासंदर्भात काही धोरणात्मक बदल करणं गरजेचं असून, याबाबत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा करणार असल्याचं समजतं.

आर्थिक मदत

लोकलवर होणाऱ्या हल्ल्यांमधील जखमी महिला प्रवाशांना आर्थिक मदत मिळाल्यास महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वे प्रवासावेळी अनेकदा महिलांना लक्ष्य करण्यात येतं. वैद्यकीय तपासण्या आणि औषधोपचार महाग असल्यानं प्रवासी खिशाला कात्री लावत उपचार घेतात. उपचार सुरू असताना नोकरीवर जाणंही शक्य नसतं. त्यामुळं प्रवाशांच्या या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांसह रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक बोलविण्यात आली होती.

रेल्वेमंत्र्यांना पत्र

हल्ल्यामध्ये जखमी होणाऱ्या प्रवाशांना आर्थिक मदत करण्याबाबत रेल्वे प्रशासनाकडं सध्या कोणतीही तरतूद नाही. आर्थिक मदत करण्याबाबत धोरणात्मक निर्णयाची गरज आहे. बॉम्बस्फोट अथवा अन्य दुर्घटनेत प्रवाशाचा मृत्यू आणि जखमी झाल्यास त्याला मदत जाहीर करण्यात येते. मात्र, समाजकंटकाच्या हल्ल्यामुळे महिला प्रवाशांची काही चूक नसताना त्यांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहणार असल्याची माहिती मिळते.



हेही वाचा -

महाशिवआघाडीला सोनियांची मंजुरी?

सुजॉय घोषच्या 'कहानी ३’ची स्टोरी आधीच लिक, पण 'हा' आहे ट्विस्ट



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा