महाशिवआघाडीला सोनियांची मंजुरी?

शिवसेनेला सोबत घेऊन महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याला काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा ​सोनिया गांधी​​​ यांनी हिरवा कंदील दिल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

SHARE

शिवसेनेला सोबत घेऊन महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याला काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हिरवा कंदील दिल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. यांत तथ्य असल्यास महाराष्ट्रातील सत्ताकोंडी लवकरच दूर होऊ शकते. 

हेही वाचा- अपमानित करण्यासाठी जागा बदलली? राऊतांचं थेट उपराष्ट्रपतींना पत्र

भाजप ऐवजी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेने उत्सुकता दाखवूनही सोनिया गांधी त्यास अनुकूल नव्हत्या. तर हिंदुत्ववादी विचारधारेच्या पक्षासोबत जाण्यापेक्षा पुन्हा निवडणुकीला सामोरे गेलेलं बरं, अशी भूमिका काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी घेतली होती. मात्र सत्ता स्थापनेची संधी सोडल्यास महाराष्ट्रातून काँग्रेस हद्दपार होईल, याचा हवाला देत काँग्रेस आमदारांनी कशीबशी सोनिया गांधी यांची समजूत घातली. तरीही त्यांच्याकडून याबद्दल थेट उत्तर येत नसल्याने काँग्रेसमध्येही अस्वस्थता पसरली होती. 

हेही वाचा- शिवसेनेचा कुठलाही आमदार नाराज नाही, एकनाथ शिंदेंचा खुलासा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच सोनिया गांधींची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी ‘नो’ कमेट्स म्हणत सत्तास्थापनेवर प्रतिक्रिया देण्यास टाळलं असलं, तरी त्यांच्याकडून महाशिवआघाडीला मंजुरी देण्यात आली असल्याचं म्हटलं जात आहे. सोबतच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक शरद पवार यांच्या निवासस्थानी होत असल्याने महाशिवआघाडीबाबतची घोषणा लवकरच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  हेही वाचा- 

सत्तास्थापनेबाबत गुरूवारी चित्र स्पष्ट होईल - संजय राऊत

‘युतीया’ बनवायचं बंद करा, सरकार स्थापनेवरून मनसेचा टोलासंबंधित विषय
ताज्या बातम्या