शिवसेनेचा कुठलाही आमदार नाराज नाही, एकनाथ शिंदेंचा खुलासा

शिवसेनेत कुणीही नाराज नसून शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या बातमीवर कुणीही विश्वास ठेवू नये, असं म्हणत ​शिवसेना​​​ नेते आमदार एकनाथ शिंदे यांनी नाराजीचं वृत्त फेटाळून लावलं.

SHARE

शिवसेनेत कुणीही नाराज नसून शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या बातमीवर कुणीही विश्वास ठेवू नये, असं म्हणत शिवसेना नेते आमदार एकनाथ शिंदे यांनी नाराजीचं वृत्त फेटाळून लावलं.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नाराज असलेल्या शिवसेनेच्या १७ आमदारांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्यासोबत मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपलं म्हणणं मांडल्याची बातमी पसरली होती.

त्यावर खुलासा करताना एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेनेच्या सर्व आमदारांनी सत्ता स्थापनेचे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. त्यामुळे ते जो निर्णय घेतील तो महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचाच निर्णय असेल, याची आम्हा सर्वांना जाणीव आहे. शिवसैनिक हे पक्षशिस्त पाळणारे असल्याने आमच्यासाठी उद्धव ठाकरे यांचा शब्द आमच्यासाठी अंतिम आहे. त्यामुळे शिवसेना आमदार नाराज असल्याची बातमी पूर्णपणे खोटी आहे.हेही वाचा-

अपमानित करण्यासाठी जागा बदलली? राऊतांचं थेट उपराष्ट्रपतींना पत्र

शिवसेना एकटी पडली, शरद पवारांचं घुमजाव?संबंधित विषय
ताज्या बातम्या