शिवसेना एकटी पडली, शरद पवारांचं घुमजाव?

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ​शरद पवार​​​ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील सरकार स्थापनेबाबतचा गोंधळ आणखी वाढला आहे.

SHARE

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील सरकार स्थापनेबाबतचा गोंधळ आणखी वाढला आहे. खासकरून सारं काही राष्ट्रवादी-काँग्रेसच्या भूमिकेवर विसंबून असलेल्या शिवसेनेची अवस्था तर ‘इकडे आड तिकडे विहिर’, अशी झाली आहे.

हेही वाचा- राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक, सत्ता स्थापनेचा पेच सुटणार?

शिवसेनेसोबत मिळून सरकार स्थापन करण्याविषयी कुठलीही चर्चा झालेली नाही. किमान समान कार्यक्रमावरही अजून निर्णय झालेला नाही, असं म्हणत शरद पवार यांनी हा गोंधळ वाढवला. त्यामुळे शिवसेनेचं काय होणार असे प्रश्न लागलीच उपस्थित व्हायला लागले. भाजपसोबत ताटातूट झाल्याने शिवसेनेचं सत्ता स्थापनेचं पूर्ण गणित राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर अवलंबून आहे. पण राष्ट्रवादीने हात वर केल्यास शिवसेनेसमोर हात चोळत बसण्यावाचून कुठलाही पर्याय नसेल. 

पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी तत्काळ त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्यात लवकरच शिवसेनेच्या नेतृत्वात स्थिर सरकार येणार, असा दावा केला. शिवाय पवारांना प्रतिप्रश्न करू शकत नाही, असंही ते म्हणाले.

या सर्व परिस्थितीकडे पाहता शिवसैनिकांमध्येही चिंतेचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपसोबत बोलणी सुरू करावी, असं काही शिवसेना नेत्यांचं मत आहे. तर काहींच्या मते शिवसेनेने कुठलीही तडजोड न करता ही लढाई एकट्याने लढली पाहिजे, तेव्हाच भविष्यात यश मिळेल.हेही वाचा-


शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेबाबत अजून चर्चाच नाही, शरद पवारांनी वाढवला संभ्रम

पुढच्या २ दिवसांत सरकार स्थापनेबाबत अंतिम निर्णय- नवाब मलिकसंबंधित विषय
ताज्या बातम्या