पुढच्या २ दिवसांत सरकार स्थापनेबाबत अंतिम निर्णय- नवाब मलिक

पुढच्या २ दिवसांत महाराष्ट्रातील सरकार स्थापनेबाबतचा अंतिम निर्णय जाहीर होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

SHARE

पुढच्या २ दिवसांत महाराष्ट्रातील सरकार स्थापनेबाबतचा अंतिम निर्णय जाहीर होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.  

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात बैठक झाल्यानंतर मंगळवारी दोन्ही पक्षांतील ज्येष्ठ नेत्यांची बैठक होणं अपेक्षित आहे. त्यानंतरच नवीन सरकारच्या स्थापनेसंदर्भातील प्रक्रियेला अंतिम रुप प्राप्त होईल.  

मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं की, राज्याला स्थिर सरकार देणं हा आमचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना तो काँग्रेसच्या सहमतीनेच घेण्यात येईल. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या बैठकीनंतरच सरकार स्थापनेबाबतची पुढची दिशा स्पष्ट होईल.  हेही वाचा-

सत्ता स्थापनेबद्दल शिवसेनेला विचारा, शरद पवार यांची गुगली

अखेर 'एनडीए'तून शिवसेना बाहेर, भाजपकडून शिक्कामोर्तबसंबंधित विषय
ताज्या बातम्या