Advertisement

सत्ता स्थापनेबद्दल शिवसेनेला विचारा, शरद पवार यांची गुगली


सत्ता स्थापनेबद्दल शिवसेनेला विचारा, शरद पवार यांची गुगली
SHARES

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेबाबत खल सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साेमवारी सकाळी गुगली टाकली. प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारताच सरकार स्थापनेबद्दल भाजप-शिवसेनेला विचारा असं म्हणत, त्यांनी पत्रकारांना गाेंधळात टाकलं. 

हेही वाचा- बाळासाहेबच NDA चे संस्थापक होते, राऊतांनी भाजपला सुनावलं

सोमवारपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. या अधिवेशनासाठी पवार दिल्लीला पोहोचले असता, प्रसारमाध्यमांनी त्यांनी घेरलं आणि सत्ता स्थापनेबद्दल विचारलं. तेव्हा पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना “शिवसेना-भाजपने एकत्रित निवडणूक लढवली होती. तर काँग्रेस-राष्ट्रवादी वेगळे लढले होते. त्यामुळे सरकार स्थापनेबद्दल त्यांनाच विचारा”, असं शरद पवार म्हणाले. 

पवार यांच्या या वक्तव्याने पत्रकारांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं. शिवाय सोनिया गांधी यांची भेट हा शिष्टाचाराचा भाग असल्याचंही ते म्हणाले.

हेही वाचा- अखेर 'एनडीए'तून शिवसेना बाहेर, भाजपकडून शिक्कामोर्तब

पवार सायंकाळी ५ वाजता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकार स्थापनेवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यानंतर सरकार स्थापनेबद्दलची घोषणा होण्याची शक्यता आहे. हेही वाचा- 

राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम, दिल्लीत शरद पवार घेणार सोनिया गांधींची भेट

फडणवीस ज्योतिषशास्त्राचे विद्यार्थी आहेत काय? शरद पवारांचा टोलासंबंधित विषय
Advertisement