Advertisement

अखेर 'एनडीए'तून शिवसेना बाहेर, भाजपकडून शिक्कामोर्तब


अखेर 'एनडीए'तून शिवसेना बाहेर, भाजपकडून शिक्कामोर्तब
SHARES

शिवसेना एनडीएतून बाहेर पडली असून यावर भाजपकडून शिकामोर्तब करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवरून भाजपसोबत शिवसेनेनं काडीमोड घेतली आहे. दरम्यान, शिवसेना एनडीएतून बाहेर पडली असल्यानं संसदेतील लोकसभा आणि राज्यसभेत या दोन्ही सभागृहांत शिवसेनेचे खासदार विरोधी पक्षात बसणार आहेत. ते विरोधी पक्षांच्या बाकावर बसतील, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी प्रसारमाध्यमांना दिली. मात्र शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढण्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सवाल उपस्थित केला आहे.

हेही वाचा - 'काॅमन मिनिमम प्रोग्राम'मागचं गुपित

मंत्रिपदाचा राजीनामा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील शिवसेनेचे एकमेव मंत्री अरविंद सावंत यांनी मागील सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. 'अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. एनडीएच्या बैठकीलाही ते उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळं ते एकप्रकारे एनडीएतूनच बाहेर पडले आहेत. त्यामुळं त्यांना लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षांच्या बाकावर बसवले जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.

सर्वपक्षीय बैठक

याबाबत सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिल्याचं समजतं. दरम्यान, लोकसभेत आसन व्यवस्था वाटपाची प्रक्रिया सुरू असून, शिवसेनेच्या राज्यसभेतील तिन्ही सदस्यांना विरोधी पक्षाची आसनं देण्यात आली आहेत.हेही वाचा -

राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम, दिल्लीत शरद पवार घेणार सोनिया गांधींची भेट

आता उपनगरी रेल्वे होणार आणखी वेगवानसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा