Advertisement

राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम, दिल्लीत शरद पवार घेणार सोनिया गांधींची भेट


राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम, दिल्लीत शरद पवार घेणार सोनिया गांधींची भेट
SHARES

महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच अजुनही कायम आहे. मात्र, आता राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सोमवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सेनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान राज्यातील सत्ताकोंडीवर चर्चा होणार आहे. तसंच, मंगळवारी राज्यातील दोन्ही काँग्रेसचे नेते एकत्र बसून पर्यायी सरकार निर्माण करण्यावर भर देणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. पुण्यात राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी याबाबत माहिती दिली.

राजकीय परिस्थितीवर चर्चा

या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे. त्यामुळं राज्यात पर्यायी सरकार निर्माण झालं पाहिजे, असा निष्कर्ष या बैठकीत काढण्यात आला. आम्ही राज्यात काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढलो. त्यामुळं कोणताही निर्णय घेताना काँग्रेससोबत चर्चा केली जाणार आहे. त्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचं मलिक यांनी म्हटलं.

मुंबईत बैठक

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सोमवारी दिल्लीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा होणार आहे. त्यानंतर मंगळवारी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत पर्यायी सरकार स्थापन करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.



हेही वाचा -

‘आयडॉल’ला हवाय प्रभावी संचालक

SIP तून घ्या शेअर बाजाराचा फायदा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा