Advertisement

शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेबाबत अजून चर्चाच नाही, शरद पवारांनी वाढवला संभ्रम

सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या चर्चेत शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याबाबत कुठलीही बातचीत झाली नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ​शरद पवार​​​ यांनी या सत्तापेचातील संभ्रम आणखी वाढवला आहे.

शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेबाबत अजून चर्चाच नाही, शरद पवारांनी वाढवला संभ्रम
SHARES

महाराष्ट्रातील सत्तापेचावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. परंतु काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या चर्चेत शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याबाबत कुठलीही बातचीत झाली नाही,  असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या सत्तापेचातील संभ्रम आणखी वाढवला आहे. शिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेसोबत जाणार की नाही हे अजूनही अस्पष्ट असल्याने शिवसेनेच्या पोटातही गोळा येऊ शकतो.

हेही वाचा- 'काॅमन मिनिमम प्रोग्राम'मागचं गुपित

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू झाल्याने सोमवारी दिल्लीत दाखल झालेल्या शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची संध्याकाळी भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये तब्बल ४५ ते ५० मिनिटे चर्चा केली. त्यानंतर पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पवार यांनी त्यांच्यात आणि सोनियांमध्ये केवळ महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर जुजबी चर्चा झाल्याचं सांगितलं. 

तुम्ही शिवसेनेसोबत सरकार सरकार स्थापन करणार की नाही? याबाबत पत्रकारांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करूनही शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यावर दोघांमध्ये कुठलंही बोलणं झालं नाही, हेच त्यांनी वारंवार सांगितलं.  

 हेही वाचा- राज्यात भाजपशिवाय सरकार स्थापन होऊच शकत नाही, चंद्रकांत पाटील यांचा दावा


महाराष्ट्रात तिन्ही पक्षांचे नेते मिळून किमान समान कार्यक्रमावर चर्चा करत आहेत. त्यामुळे हा फाॅर्म्युला तरी ठरला आहे की नाही? असा प्रश्न विचारल्यावर किमान समान कार्यक्रमावर महाराष्ट्रातील नेते चर्चा करत असून  अजून हा फाॅर्म्युला ठरलेला नाही, असं त्यांनी सांगितलं. शिवाय आम्ही काँग्रेस आणि इतर मित्रपक्षांसोबत निवडणूक लढवली होती. त्यामुळे लहान पक्षांना विचारात न घेता आम्ही कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 



हेही वाचा- 

सत्ता स्थापनेबद्दल शिवसेनेला विचारा, शरद पवार यांची गुगली

अखेर 'एनडीए'तून शिवसेना बाहेर, भाजपकडून शिक्कामोर्तब



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा