Advertisement

राज्यात भाजपशिवाय सरकार स्थापन होऊच शकत नाही, चंद्रकांत पाटील यांचा दावा

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सरकार स्थापनेची तयारी सुरू असताना राज्यात ​भाजपशिवाय​​​ कुणाचंही सरकार येऊच शकत नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

राज्यात भाजपशिवाय सरकार स्थापन होऊच शकत नाही, चंद्रकांत पाटील यांचा दावा
SHARES

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सरकार स्थापनेची तयारी सुरू असताना राज्यात भाजपशिवाय कुणाचंही सरकार येऊच शकत नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी २ दिवसांपासून सुरू असलेल्या भाजपच्या चिंतन बैठकीतील माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की विधानसभा निवडणुकीत भाजपचे १०५ आमदार निवडून आले आहेत. तर आम्हाला १४ अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. अशा स्थितीत ज्यांच्याकडे ११९ आमदार आहेत, त्यांना घेतल्याशिवाय राज्यात कुणाचंही सरकार बनू शकणार नाही. 

त्यामुळे आमच्याशिवाय कुणाचंही सरकार बनू शकत नाही. हीच गोष्ट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बैठकीत सांगितल्याचं पाटील म्हणाले. मात्र सत्ता स्थापनेसंदर्भात कुणासोबतही चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 



हेही वाचा-

राजकारणातला चेंडू भाजपला दिसलाच नाही, थोरातांचा गडकरींना टोला

भाजपाशिवाय कोणाचेही सरकार येणार नाही - देवेंद्र फडणवीस



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा