राजकारणातला चेंडू भाजपला दिसलाच नाही, थोरातांचा गडकरींना टोला

क्रिकेट आणि राजकारणात खूप अंतर असून भाजपला राजकारणातला चेंडू दिसलाच नाही, असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय दळणवळणमंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांच्यावर टीका केली.

SHARE

राजकारण आणि क्रिकेटची तुलना करत एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सध्या भाजप आणि आघाडीतील नेते सोडताना दिसत नाहीय. क्रिकेट आणि राजकारणात खूप अंतर असून भाजपला राजकारणातला चेंडू दिसलाच नाही, असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय दळणवळणमंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांच्यावर टीका केली.


काय म्हणाले होते गडकरी?

क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं. क्रिकेटमध्ये अनेकवेळा आपला पराभव होईल असं वाटतं पण अचानक चित्र पालटतं आणि निकाल तुमच्या बाजूनं लागतो. राजकारणाचंही तसंच आहे, असं पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना गडकरी म्हणाले होते.  

त्यावर प्रतिक्रिया विचारल्यावर थोरात म्हणाले, क्रिकेट आणि राजकारणात खूप फरक आहे. क्रिकेटमध्ये चेंडू दिसतो. राजकारणात तसं होतंच असं नाही. भाजपचंही तेच झालं. त्यांना चेंडू दिसलाच नाही.

सोबतच राज्यातील जनतेला जास्त वेळ थांबावं लागणार नाही. कारण लवकरच नवीन सरकार स्थापन होईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाबाबत दिल्लीच्या स्तरावर निर्णय होतील, असंही त्यांनी सांगितलं.हेही वाचा- 

फडणवीस ज्योतिषशास्त्राचे विद्यार्थी आहेत काय? शरद पवारांचा टोला

आधी राज ठाकरेंना भेटायलाही मातोश्रीवरुन कुणी जायचं नाही, पण आता...संबंधित विषय
ताज्या बातम्या