Advertisement

आधी राज ठाकरेंना भेटायलाही मातोश्रीवरुन कुणी जायचं नाही, पण आता...


आधी राज ठाकरेंना भेटायलाही मातोश्रीवरुन कुणी जायचं नाही, पण आता...
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कुटुंबातील सदस्य म्हणून भेटण्यासाठी मातोश्रीवरुन आधी कुणीही जायचं नाही. पण आता काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीबाहेर पडून पंचतारांकीत हाॅटेलच्या चकरा मारल्या जात असल्याची खोचक टीका भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केली. 

हेही वाचा- फडणवीस ज्योतिषशास्त्राचे विद्यार्थी आहेत काय? शरद पवारांचा टोला

राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी सध्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या सातत्याने बैठका सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांनी देखील वांद्र्यातील हाॅटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. त्यावरून शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

शेलार म्हणाले, राज्यामध्ये तिन्ही पक्षांचं सुरु असलेलं नाटक महाराष्ट्राला अमान्य आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये एकमेकांना भेटण्यासाठी ओढ लागली आहे. पूर्वी मातोश्रीचा सन्मान ठेवत, बाळासाहेबांच्या प्रती आदर ठेऊन भाजपाचे सर्वोच्च नेते मातोश्रीवर राजनैतिक चर्चा करायला जायचे. इतर पक्षाचे नेतेही जायचे. हे साऱ्या महाराष्ट्राने बघितलं आहे. पण सध्या सत्तेच्या लालसेपोटी मातोश्रीतून बाहेर पडून पंचातारांकित हॉटेलच्या वाऱ्या केल्या जात आहेत. याआधी तर कुटुंबातील सदस्य असून राज ठाकरेंना भेटायलाही मातोश्रीवरुन कुणी जात नव्हतं. पण आज मातोश्रीबाहेर पडून माणिकराव ठाकरेंना भेटायलासुद्धा लोकं जात आहेत.

हेही वाचा- विधानसभा निलंबित असली तरी आमदारांना मतदान करता येणार

सोबतच वयासोबत परिपक्वता वाढावी असा टोला लगावत शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात विसंवाद निर्माण करण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊतच जबाबदार असल्याचा आरोप केला.



हेही वाचा-
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे संजय राऊतांकडून तोंड भरून कौतुक

उद्धव ठाकरे -अहमद पटेल यांची बैठक झालीच नाही; अफवा पसरवणं बंद करा - संजय राऊत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा