Advertisement

विधानसभा निलंबित असली तरी आमदारांना मतदान करता येणार

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने विधानसभा निलंबित आहे. त्यामुळे नवनिर्वाचीत आमदारांना विकास निधी तसंच भत्तेही मिळणार नाहीत.

विधानसभा निलंबित असली तरी आमदारांना मतदान करता येणार
SHARES

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने विधानसभा निलंबित आहे. त्यामुळे नवनिर्वाचीत आमदारांना विकास निधी तसंच भत्तेही मिळणार नाहीत. मात्र, विधानसभा निलंबित असली तरी या आमदारांना राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करता येणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांना पुन्हा राज्यसभेत प्रवेश करण्यास कसलीही अडचण येणार नाही. 

 एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शरद पवार, रामदास आठवले, हुसेन दलवाई, राजकुमार धूत, माजिद मेनन, अमर साबळे आणि संजय काकडे या राज्यसभेच्या सात सदस्यांची मुदत संपणार आहे.  राष्ट्रपती राजवट ११ मेपर्यंत असणार आहे. विधानसभा निलंबित असली तरी राज्यसभेची निवडणूक घेता येते. निलंबित विधानसभेतही आमदारांचे हक्क कायम असतात. त्यामुळे आमदारांना राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करता येईल.

फेब्रुवारीअखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात राज्यसभेची निवडणूक पार पडेल. शरद पवार आणि  रामदास आठवले हे पुन्हा राज्यसभेची निवडणूक लढवतील. राज्यसभा निवडणुकीत आमदारांना मतदान करता येणार असल्याने शरद पवार आणि रामदास आठवले यांचा राज्यसभेचा मार्ग मोकळा होणार आहे. यापूर्वी २०१५ मध्ये जम्मू आणि काश्मीर विधानसभा निलंबित असताना, राज्यसभेची निवडणूक पार पडली होती.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा