राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक, सत्ता स्थापनेचा पेच सुटणार?


SHARE

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून २६ दिवस झाले असून राज्यात अजूनही सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यापासून सर्व पक्षाच्या नेत्यांच्या बैठका होत आहेत. मात्र, तरीही सत्तास्थापनेचा निकाल लागत नाही आहे. अशातच, महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या पेचप्रसंगाबाबत आणखी विचारविनिमय करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची मंगळवारी दिल्लीत बैठक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यात सोमवारी झालेल्या बैठकीतील मुद्द्यांवर राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा - पुढच्या २ दिवसांत सरकार स्थापनेबाबत अंतिम निर्णय- नवाब मलिक

दिल्लीत बैठक

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, नवाब मलिक, सुप्रियाताई सुळे आदी नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. बैठकीसाठी मुंबईहून जयंत पाटील आणि नवाब मलिक हे सोमवारी रात्रीच रवाना झाले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या २ पक्षांचे ज्येष्ठ नेते पुन्हा दिल्लीत भेटणार आहेत. त्यानंतर पुढील रणनीती निश्चित होणार आहे.

नेत्यांची भूमिकेवर लक्ष

विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी महाआघाडीत अनेक घटक पक्ष होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी, समाजवादी पार्टीचे नेते अबु असीम आझमी, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील, बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. अशोक ढवळे, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे आदींचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे. त्यासाठी त्या घटक पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करण्यात येणार असल्याचं समजतं.हेही वाचा -

शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेबाबत अजून चर्चाच नाही, शरद पवारांनी वाढवला संभ्रम

शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर होणार मुंबईच्या नव्या महापौरसंबंधित विषय
ताज्या बातम्या