Advertisement

शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर होणार मुंबईच्या नव्या महापौर


शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर होणार मुंबईच्या नव्या महापौर
SHARES

मुंबई महापालिकेच्या महापौर म्हणून शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. पेडणेकर यांनी सोमवारी शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमेदवार म्हणून अर्ज भरला. तर सुहास वाडकर यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज भरला. पेडणेकर यांनी महापालिकेच्या विविध पदांवर काम केलं आहे.  

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार महापालिकेतील महापौर दालनात शिवसेना सचिव अनिल परब यांची महापौर आणि सेना नगरसेवकांसोबत बैठक झाली. त्यात पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. येत्या ९ मार्च रोजी महापौरपदाची निवडणूक होणार आहे. 

 हेही वाचा- दोषी कंत्राटदारांना बीएमसीच्या पायघड्या, शिक्षेत केली कपात

मुंबईचं महापौरपद खुल्यावर्गासाठी राखीव झाल्याने या पदासाठी शिवसेनेतील अनेक नगरसेवकांनी लॉबिंग सुरू केली होती. त्यहत  मंगेश सातमकर, रमाकांत रहाटे, यशवंत जाधव आदी ज्येष्ठ नगरसेवकांचा समावेश होता. परंतु आक्रमक स्वभावाच्या पेडणेकर यांनी या सर्वांवर मात केली.  

पेडणेकर युवासेना प्रमुख आणि वरळीतील आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील नगरसेविका आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांनी आदित्य यांच्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. या मेहनतीचं फळ म्हणून त्यांना महापौरपद देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.



हेही वाचा- 

मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार नाही- मनोज कोटक

मुंबईला मिळणार नवा महापौर, पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा