Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
54,05,068
Recovered:
48,74,582
Deaths:
82,486
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
34,288
1,240
Maharashtra
4,45,495
26,616

मुंबईला मिळणार नवा महापौर, पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव

राज्यभरातल्या २७ महापालिकांमधील महापौरपदाचं आरक्षण नुकतंच जाहीर झालं आहे. या आरक्षण सोडतीनुसार मुंबई महापालिकेतील महापौरपदासाठी खुला प्रवर्ग जाहीर करण्यात आला आहे.

मुंबईला मिळणार नवा महापौर, पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव
SHARES

राज्यभरातल्या २७ महापालिकांमधील महापौरपदाचं आरक्षण नुकतंच जाहीर झालं आहे. या आरक्षण सोडतीनुसार मुंबई महापालिकेतील महापौरपदासाठी खुला प्रवर्ग जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे इच्छुक नगरसेवकांकडून महापौरपदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी यासाठी हालचाली सुरू होणार आहेत.

राज्यातील अनेक महापालिकांमधील अडीच वर्षांचा कार्यकाळ संपला असला तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे या आरक्षण सोडतीला ३ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदतवाढ २२ नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळे महापौरपदांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली.  

हेही वाचा- महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव

या सोडतीनुसार मुंबईसहीत ठाणे, पुणे, नागपूर आणि नाशिक महापालिकेतील महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलं आहे. तर नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, पनवेल, अकोला, चंद्रपूर, भिवंडी आणि जळगाव महापालिकेचं महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलं आहे.

मुंबई महापालिकेचं महापौरपद याआधीही खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्याने २०१७ मध्ये या पदावर प्रा. विश्वनाथ महाडेश्वर यांची निवड करण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळ ८ सप्टेंबर २०१९ रोजी संपत होता. परंतु निवडणुकांमुळे त्याला मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार येत्या २२ नोव्हेंबरला मुंबईच्या नव्या महापौरांची निवड करण्यात येणार आहे.

 'असं' आहे आरक्षण-

 • मुंबई - खुला प्रवर्ग
 • पुणे - खुला प्रवर्ग
 • नागपूर - खुला प्रवर्ग
 • ठाणे- खुला प्रवर्ग
 • नाशिक - खुला प्रवर्ग
 • नवी मुंबई -  खुला प्रवर्ग महिला
 • पिंपरी चिंचवड -  खुला प्रवर्ग (महिला)
 • औरंगाबाद- खुला प्रवर्ग (महिला)
 • कल्याण डोंबिवली -खुला प्रवर्ग
 • वसई विरार- अनुसूचित जमाती
 • मिरा भाईंदर-अनुसुचित जाती
 • चंद्रपूर - खुला प्रवर्ग (महिला)
 • अमरावती- ओबीसी
 • पनवेल- खुला प्रवर्ग (महिला)
 • नांदेड- ओबीसी महिला
 • अकोला - खुला प्रवर्ग (महिला)
 • भिवंडी- खुला प्रवर्ग (महिला)
 • उल्हासनगर- खुला प्रवर्ग
 • अहमदनगर-  अनुसूचित जाती (महिला)
 • परभणी- अनुसूचित जाती (महिला)
 • लातूर -  ओबीसी सर्वसाधारण
 • सांगली- खुला प्रवर्ग
 • सोलापूर- ओबीसी (महिला)
 • कोल्हापूर- ओबीसी (महिला)
 • धुळे - ओबीसी सर्वसाधारण
 • मालेगाव - ओबीसी (महिला)
 • जळगाव - खुला प्रवर्ग (महिला)संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा