Advertisement

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव

शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांची बंडखोरी बांद्रा पूर्व मतदारसंघातून शिवसेनेला महागात पडली आहे. या मतदारासंघातून शिवसेना उमेदवार मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा काँग्रेसच्या झिशान बाबा सिद्दीकी यांनी पराभव केला आहे.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव
SHARES

शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांची बंडखोरी बांद्रा पूर्व मतदारसंघातून शिवसेनेला महागात पडली आहे. या मतदारासंघातून शिवसेना उमेदवार मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा काँग्रेसच्या झिशान बाबा सिद्दीकी यांनी पराभव केला आहे. झिशान हे ४,२८५ मतांनी विजयी झाले आहेत. 

बांद्रा पूर्व विधानसभा मतदारसंघातील पराभव हा शिवसेनेसाठी मोठा धक्का आहे. ही जागा शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची होती. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान या मतदारसंघात आहे.  शिवसेनेने विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना डावलून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना बांद्रा पूर्व मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यामुळे तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. सावंत यांच्या बंडखोरीमुळे महाडेश्वर यांना चांगलंच आव्हान निर्माण झालं होतं. ही बंडखोरी झिशान यांच्या पथ्थ्यावर पडली.  झिशान काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आहे. 

 २००९ पासून ही जागा शिवसेनेकडे आहे. २०१५ साली आमदार बाळा सावंत यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली. काँग्रेसने त्यावेळी नारायण राणे यांना येथून उमेदवारी दिली. मात्र तृप्ती सावंत यांनी राणे यांचा पराभव केला. 

यंदा शिवसेनेने महाडेश्वर यांना उमेदवारी दिली. महाडेश्वर १५ वर्ष नगरसेवक आहेत. तृप्ती सावंत या गेली चार वर्ष स्थानिक शिवसैनिकांच्या संपर्कात नव्हत्या असं बोललं जात होतं. त्यामुळे त्यांना उमेदवारी डावलण्यात आली.  महाडेश्वर यांनी या मतदारसंंघातून निवडणूक लढवण्यासाठी आधीच तयारी सुरु केली होती. 


हेही वाचा -

माहीममधून सदा सरवणकर १७ हजार मतांनी विजयी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा