Advertisement

माहीममधून सदा सरवणकर १८ हजार मतांनी विजयी

संपूर्ण मुंबईचं लक्ष लागून राहिलेला माहीम मतदारसंघ शिवसेनेने कायम राखला आहे. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी प्रतिष्ठेचा असलेल्या या मतदारसंघातून शिवसेनेचे सदा सरवणकर यांनी बाजी मारली आहे.

माहीममधून सदा सरवणकर १८ हजार मतांनी विजयी
SHARES

संपूर्ण मुंबईचं लक्ष लागून राहिलेला माहीम मतदारसंघ शिवसेनेने कायम राखला आहे. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी प्रतिष्ठेचा असलेल्या या मतदारसंघातून शिवसेनेचे सदा सरवणकर यांनी बाजी मारली आहे. त्यांनी मनसेचे संदीप देशपांडे यांचा १८ हजार ६५९ मतांनी पराभव केला


सदा सरवणकर यांना ६१ हजार २२३ मतं मिळाली. तर संदीप देशपांडे यांना ४२ हजार ६९८ मतं मिळाली. तिसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसचे उमेदवार प्रवीण नाईक यांना १४ हजार ९५३ मतं मिळाली. सरवणकर यांच्या विजयानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. 

शिवसेनेचे पक्ष मुख्यालय शिवसेनाभवन आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान या मतदारसंघात आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांसाठी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा होता. पहिल्या फेरीपासूनच शिवसेना आणि मनसेमध्ये चुरस होती. पण सदा सरवणकर पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. मात्र, सरवणकर आणि देशपांडे यांच्यामधील मतांचं अंतर कमी होतं. त्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली होती. मात्र, सरवणकर यांनी आपली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवून विजयाची माळ गळ्यात घातली.





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा