Advertisement

मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार नाही- मनोज कोटक


मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार नाही- मनोज कोटक
SHARES

मुंबई महापौरपदासाठी २२ नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. मात्र, या निवडणुकीसाठी भाजप उमेदवार देणार नसल्याची माहिती समोर येत आहे. भाजपकडं आवश्यक संख्याबळ नसल्यानं भाजपा मुंबई महापौरपदाची निवडणूक लढवणार नसल्याची माहिती भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी दिली आहे.

शेवटचा दिवस

मुंबई महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार शेवटचा दिवस आहे. सध्या मुंबई महानगरपालिकेत भूमिका बजावत असलेल्या भाजपानं महापालिकेच्या महापौरपदाच्या निडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे.'महापौरपदाची निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक संख्याबळ पक्षाकडं नाही. त्यामुळं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, २०२२ मध्ये मुंबई महानगरपालिकेत भाजपाचाच महापौर विराजमान होईल’, अशी माहिती मनोज कोटक यांनी दिली.

हेही वाचा - मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेच्या 'ह्या' नगरसेवकांमध्ये स्पर्धा

मुख्यमंत्रिपदावरून वाद

महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदावरून वाद कायम सुरू असून, शिवसेना आणि भाजप यांच्यातील युती तुटली होती. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये युती तुटण्याचं काय परिणाम होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर भाजपा आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रिपदावरून वाद निर्माण झाला होता.



हेही वाचा -

न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ

लोकलनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांमध्ये 'याची' प्रचंड वाढ



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा