Advertisement

लोकलनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांमध्ये 'याची' प्रचंड वाढ


लोकलनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांमध्ये 'याची' प्रचंड वाढ
SHARES

मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण मुंबईकरांमध्ये विसराळूपणा प्रचंड वाढत आहे. लोकलनं प्रवास करणारे प्रवाशांमध्ये घड्याळाच्या काट्यावरची धावपळ, कामाचा ताण, वरिष्ठांचा दबाव, जेवणाच्या अयोग्य वेळा या कारणांमुळं विसराळूपणा वाढत आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०१९ या काळात ८७६ प्रवाशांनी वस्तू हरवल्याची तक्रार नोंदवली. यापैकी ८३३ प्रवाशांना त्यांच्या हरवलेल्या वस्तू पुन्हा परत करण्यात आल्या आहेत. उर्वरित ४३ प्रवाशांच्या वस्तू मुख्यालातील गहाळ वस्तू कार्यालयात सांभाळून ठेवल्या आहेत. यांचं एकूण मूल्य २ कोटी २२ लाख ७७ हजार ९१० रुपये आहे.

हेही वाचा - मुंबई उपनगरीय लोकलला ‘एशियन बँके’कडून ५० कोटी डाॅलरची मदत

सामानांच्या चोरीची भिती

लोकलमध्ये सामान विसरलेल्या तब्बल १६८७ प्रवाशांच्या ३ कोटी ६१ लाखांच्या वस्तू पश्चिम रेल्वे रेल्वे सुरक्षा बलानं परत केल्या आहेत. जानेवारी ते ऑक्टोबर २०१९ या १० महिन्यांच्या काळातील ही आकडेवारी आहे. ऑफिसमध्ये वेळेत पोहोचण्यासाठी प्रवासी धावत लोकल पकडतात. गर्दीत बॅगेतील सामानांची चोरी होण्याची भीती आणि सहप्रवाशांना अडचण नको म्हणून लोकलमध्ये प्रवेश करताच प्रवाशांकडून बॅग डब्यातील रॅकमध्ये ठेवली जाते.

हेही वाचा - बेस्ट बस वेळेत नाही, प्रवाशांच्या अडचणीत वाढ

वस्तू हरवल्याची तक्रार

२०१८ मध्ये ८११ प्रवाशांनी वस्तू हरवल्याची तक्रार नोंदवली होती. यापैकी ७८० प्रवाशांचा १ कोटी ३८ लाख ७८ हजार ६०२ रुपयांचा मुद्देमाल परत करण्याच आल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, प्रवाशांमध्ये विसराळूपणा इतका वाढला आहे की, प्रवासी अनेकदा गर्दीमुळं भलत्याच स्थानकांवर प्रवासी उतरतात. त्यामुळं या प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर असलेल्या गर्दीमुळं पुन्हा डब्यात शिरणं शक्य होत नाही.



हेही वाचा -

राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम, दिल्लीत शरद पवार घेणार सोनिया गांधींची भेट

अखेर 'एनडीए'तून शिवसेना बाहेर, भाजपकडून शिक्कामोर्तब



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा