Advertisement

बेस्ट बस वेळेत नाही, प्रवाशांच्या अडचणीत वाढ

मुंबईकरांच्या दुसऱ्या लाइफलाइनला म्हणजेच बेस्टला आता टाइमलाइन राहिलेला नाही.

बेस्ट बस वेळेत नाही, प्रवाशांच्या अडचणीत वाढ
SHARES

मुंबईकरांच्या दुसऱ्या लाइफलाइनला म्हणजेच बेस्टला आता टाइमलाइन राहिलेला नाही. बऱ्याचदा बसचालक व वाहक यांचे गैरवर्तन, वेळेनुसार धावत नसलेल्या गाड्या, बसथांब्याची दुरवस्था, रॅश ड्रायव्हिंग यांसारख्या अनेक समस्यांना प्रवाशांना नेहमी तोंड द्याव लागतं आहे. याबाबत तक्रारी करूनही अद्याप या समस्यांवर तोडगा निघालेला नाही. या समस्या सोडविण्यात बेस्ट प्रशासन अपयशी ठरत असल्यानं प्रवाशी नाराजी व्यक्त करत आहेत.

बेस्ट बसच्या वेळेबाबत कन्झ्युमर गाइडन्स सोसासटी आॅफ इंडियानं (सीजीएसआय) आॅगस्ट महिन्यापासून बेस्ट प्रवाशांच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी मोहीम सुरू केली होती. या मोहिमेच्या माध्यमातून आतापर्यंत सीजीएसआयकडं ३५ ते ४० बेस्ट प्रवाशांच्या तक्रारी आल्या असून, बेस्ट प्रशासन या तक्रारीचे निराकरण कधी करणार? असा सवाल देखील प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनासाठी बेस्ट निधीत वाढीचा प्रस्ताव

बेस्ट बसच्या बहुतेक मार्गावरील बस थांब्यांवर वेळेत पोहोचत नाहीत. त्यामुळं प्रवाशांना तात्काळत बस थांब्यावर उभं राहावं लागतं. त्याशिवाय, प्रवाशांच्या गरजेनुसार काही बसच्या फेऱ्या कमी आहेत. त्यामुळं प्रवाशांना खिशाला कात्री लावत टॅक्सी व रिक्षानं प्रवास करावा लागतो. दरम्यान, मालाड पश्चिमे येथील रेल्वे स्थानकाकडं येणाऱ्या गाड्या वेळेनुसार धावत नाही. बस क्रमांक १२२ ही गाडी रात्रीच्या वेळेस खूप उशिरानं येते.

हेही वाचा - मुंबईतील उड्डाणपूलं बेस्ट बससाठी खुली करण्याची 'या' संस्थेची मागणी

बेस्ट प्रवाशांना ताटकळत उभं राहावे लागते. महिलांना याचा जास्त त्रास सहन करावा लागतो. त्यामुळं या मार्गावर बेस्ट प्रशासनानं जादा बसगाड्या सोडाव्यात, जेणेकरून प्रवाशांचा ताण कमी होईल. अशी मागणी प्रवासी करत आहेत. बांगुरनगर येथील बसथांब्यावर देखील बस क्रमांक २५९ ही गाडी थांबा न घेता पुढे जाते. दत्तानी पार्क ते कुर्ला स्थानकादरम्यान बसगाड्यांची फ्रिक्वेन्सीकडे बेस्ट प्रशासनानं लक्ष द्यावं. बेस्ट संदर्भातल्या यांसारख्या तक्रारी प्रवाशांनी कन्झ्युमर गाइडन्स सोसासटी आॅफ इंडिया यांच्याकडं केल्या आहेत.

हेही वाचा - 'या' कारणामुळे बेस्टने नाकारली ज्येष्ठांना बस सवलत

दरम्यान, मुंबईतील वाहनांची गर्दी प्रचंड असून, या गर्दीतून बेस्ट बसला मार्ग काढणं अशक्य झालं आहे. महत्वाच्या रस्त्यांवर आणि गल्लोगल्लीत वाहनांच्या लांबच लांब रांग लागत आहेत. त्यामुळं या वाहतुक कोंडीतून बेस्ट बसची सुटका व्हावी अशी मागणी 'आमची मुंबई, आमची बेस्ट' संस्थेच्या वतीनं केली जातं आहे. बेस्ट बस प्रवास जलद होण्यासाठी वांद्रे-वरळी सी-लिंक, वेस्टर्न एक्स्प्रेस वे, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड, आदींसह शहरातील ५० उड्डाणपूल बेस्ट बससाठी खुले करावेत, अशी मागणी 'आमची मुंबई, आमची बेस्ट' संस्थेच्या वतीनं करण्यात आली आहे.



हेही वाचा -

फडणवीस ज्योतिषशास्त्राचे विद्यार्थी आहेत काय? शरद पवारांचा टोला

मुंबईच्या महापौरपदी यशवंत जाधव?



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा