डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनासाठी बेस्ट निधीत वाढीचा प्रस्ताव


SHARE

'भारतरत्न' डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जगभर त्यांना आदरांजली वाहण्यात येतं आहे. तसंच, मुंबईतल्या दादर येथील चैत्यभूमीवर बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी लाखो आंबेडकरी अनुयायी येत असतात. या अनुयायींची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्टतर्फे विविध-विविध सुविधा पुरविल्या जातात. यंदाही आंबेडकरी अनुयायींना सुविधा पुरविण्यात येणार आहेत. मात्र, त्यांना पुरविण्यात येणाऱ्या खर्चात यंदा ३ लाख रुपयांनी वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, हा प्रस्ताव सोमवारी बेस्ट समितीसमोर मांडण्यात आला आहे.

अखंड वीज पुरवठा

बेस्ट उपक्रमाकडून शिवाजीपार्क येथील चैत्यभूमीवर ५ अणि ६ डिसेंबर रोजी अखंड वीज पुरवठा, जादा बससेवा, प्रथमोपचार, वैद्यकीय सेवा केंद्र, नेत्र तपासणी, चष्मे वाटप आदींची सुविधा पुरविली जाते. त्यासाठी उपक्रमाकडून १० लाख रुपयांचा निधी देण्यात येतो. मात्र, यंदा या खर्चात ३ लाख रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.


१० लाखांची तरतूद

या प्रस्तावावर समितीतील शिवसेनेचे सदस्य अनिल कोकीळ यांनी महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम सर्वसमावेशक असावा. तसंच, निधीची तरतूद १३ ऐवजी १५ लाख करण्याची उपसूचना केली. त्याशिवाय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या १७ नोव्हेंबरच्या कार्यक्रमासाठी १० लाख रुपयांची तरतूद करण्याचीही मागणी केली.हेही वाचा -

जे.जे. रुग्णालयात आता बिल ऑनलाइन भरता येणार

पवारांची लिलावतीत संजय राऊतांशी गुप्तगूसंबंधित विषय
ताज्या बातम्या