जे.जे. रुग्णालयात आता बिल ऑनलाइन भरता येणार

जे.जे. रुग्णालयात आता बिलाचे पैसे रोख भरण्याची आवश्यकता भासणार नाही. ऑनलाइन पैसे भरण्याची सुविधा जे.जे. रुग्णालयात लवकरच सुरू होणार आहे.

SHARE

जे.जे. रुग्णालयात आता बिलाचे पैसे रोख भरण्याची आवश्यकता भासणार नाही. ऑनलाइन पैसे भरण्याची सुविधा जे.जे. रुग्णालयात लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे बिल, औषधे यासाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना रोख रक्कम बाळगण्याची गरज नाही. जे.जे. रुग्णालयानंतर  सेंट जॉर्ज, जीटी आदी रुग्णालयांमध्ये ऑनलाइन पैसे भरण्याची सुविधा सुरू केली जाणार आहे.

 रोज हजारो रुग्ण जे.जे. रुग्णालयात येत असतात. बाह्यरूग्ण विभागात जवळपास ३ हजार रुग्ण तर  ६० ते ७० रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. बाह्यरूग्ण विभागाचे शुल्क नाममात्र असते. मात्र, रुग्णालयाची इतर बिले आणि औषधे यासाठी पैसे लागतात. रुग्णांच्या नातेवाईकांना यासाठी रोख रक्कम बाळगावी लागते. त्यामुळे आता रुग्णालयात सर्व ठिकाणी ऑनलाइन पैसे भरण्याची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. काही बँकांनी यासाठी पुढाकार दाखवला आहे. लवकरच यामधील एका बँकेची यासाठी नियुक्ती केली जाणार आहे.

 जे.जे. रुग्णालयात रुग्णांसोबत विद्यार्थ्यांनाही महाविद्यालयीन शुल्क ऑनलाइन भरता येणार आहे.  विद्यार्थ्यांना धनादेश किंवा डीडीसाठी धावपळ करावी लागणार नाही, असं  जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितलं. हेही वाचा  -

स्वाइन फ्लूचे राज्यात २४० बळी, मुंबईत ६ जणांचा मृत्यू

बीएमसी शाळांमधील मुलांमध्ये पोषणाचा अभाव
संबंधित विषय
ताज्या बातम्या